Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel PriceDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किरकोळ विक्रीदर आज खाली आले आहेत.

Goa Petrol-Diesel Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच असून गेल्या 24 तासांत त्याची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली गेली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज किरकोळ बदल दिसून येत आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरांमध्ये किरकोळ विक्रीचे दर आज खाली आले आहेत. मात्र, राजधानी दिल्ली सारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) मध्ये पेट्रोल 17 पैशांनी महाग होऊन 96.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 6 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 10 पैशांनी महाग झाले असून ते 96.57 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त होऊन 89.66 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 10 पैशांनी स्वस्त झाले असून ते 107.47 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेल 2 पैशांनी घसरल्यानंतर 94.34 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.68

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 90.23

Goa Petrol-Diesel Price
Train मध्ये 'एअर इंडिया कांड', टीटीईने महिलेवर केली लघवी; रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com