गोव्यातील आजचे कार्यक्रम

todays updates in goa

Dainik Gomantak

गोव्यातील आजचे कार्यक्रम

आज रविवारी गोव्यात या कार्यक्रमांचे होणार आयोजन

नेरुल: येथील डोंगरावर वसलेल्‍या श्री कालीमातेच्या जागृत मंदिरात दर्श अमावस्यादिनी देवीच्या जत्रोत्‍सवानिमित्त सकाळी धार्मिक विधी, दुपारी २ वाजता देवीची पालखी वेरे येथील श्री शांतादुर्गा मंदिरात जाईल व रात्री पुन्हा मदिरात येऊन ‘गोंधळ’ घालण्याचा कार्यक्रम.

प्रियोळ: बांदिवडे येथील महालक्ष्मी संस्थानात नावतकर तोरण संस्थेला यंदा ४५ वर्षे पूर्ण होत असल्याने या संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचा गौरव सोहळा सायं. ४वा.

<div class="paragraphs"><p>todays updates in goa</p></div>
गोव्यातील आजचे 'विशेष' कार्यक्रम..

माशेल: खांडोळा येथील श्री शांतादुर्गा मंदिरात सकाळी धार्मिक विधी, दु. ३.३०वा. गवळणकाला, श्रींचे देवळाय तळ्याकडे प्रयाण, आरती, गाऱ्हाणे, रात्री १०.३०वा. संगीत ‘संत तुकाराम’ नाटकाचा प्रयोग.

रायबंदर: येथील पानवेलकर कला सांस्कृतिक मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त कला संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने गोमंतकीय भजन परंपरेबरोबरच भारुड, गोंधळ असा आविष्कार घडवणारा भक्तिमहोत्सव पानवेल रायबंदर येथील श्री विठ्ठल मंदिरात.

पीर्ण: येथील श्री शांतादुर्गा मंदिरात सायं. ६वा. ‘संगीत-संध्या’ हा अभंग, भक्तिगीत, नाट्य‍गीतांचा कार्यक्रम.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com