Goa Latest News
Goa Latest NewsDainik Gomantak

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजच्या युवकांनी वाटचाल करावी

विश्व हिंदू परिषदेचे गोवा प्रांत कार्यवाहक मोहन आमशेकर यांनी कुडचडे येथे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक कार्यक्रमात सांगितले.

केपे : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या हिंदवी राज्यात त्यांनी कुणावरही अत्याचार होऊ दिले नाहीत, ही आमची हिंदू संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजच्या युवकांनी वाटचाल केली पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदेचे गोवा प्रांत कार्यवाहक मोहन आमशेकर यांनी कुडचडे येथे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक कार्यक्रमात सांगितले.

यावेळी माजी आमदार अनिल हरी प्रभू देसाई,बजरंग दलचे विराज देसाई,संकेत आर्सेकर, रिकी होर्णेकर,सुजय देसाई,व मोठ्या संख्येने बजरंग दलचे कार्यकर्ते हजर होते. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या शिवराज्याभिषेक म्हणजे हिंदू साम्राज्य दिनाची सुरुवात करून हे राज्य स्थापन केले.

Goa Latest News
देशातील पहिले जीएसटी संग्रहालय गोव्यात

मुस्लिम व ख्रिस्ती बांधवांच्या विरोधात आम्ही नाही, पण त्यांना चिथावणारे धर्मगुरू व राजकारण्यांविरोधात बजरंग दल उभे राहणार असल्याचे आमशेकर यांनी सांगितले. आमच्या या भूमीत आम्ही सर्वांना समान वागणूक दिली.

चर्च, दर्गा बांधून दिले आणि सन्मान केला; पण त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ज्या मातृभूमीवर ते राहतात, इथे श्वास घेतात, पोट भरतात, त्या भारत मातेला त्यांनी आपली भारत माता मानायला पाहिजे. हे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्याची संस्कृती राखायची असेल तर आमच्या आई बहिणींना बाहेर सरण्यासाठी भीती वाटू नये, अशी आपली कामगिरी आणि वाटचाल असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हिंदू संस्कृतीत गोमातेला अनन्य साधारण महत्व असून आम्ही तिला देवता मानतो व यासाठी आम्ही गोवंश संवर्धन सांभाळायला पाहिजे. गो हत्या करणाऱ्याला कदापि माफी मिळणार नाही असे बजरंग दलाचे विराज देसाई यांनी सांगितले. देशात दुर्जन वाढले असून देश खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा लोकांविरुद्ध बजरंग दल उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com