गोवा सरकारची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; 31 मार्चपूर्वी शौचालये दिली जातील

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

गोव्यामध्ये ज्यांनी वैयक्तिक शौचालयांसाठी ग्रामपंचायतीकडे ठराविक रक्कम जमा केली आहे. त्या सर्वांनाच 31 मार्चपूर्वी शौचालये दिली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केली.

पणजी: गोव्यामध्ये ज्यांनी वैयक्तिक शौचालयांसाठी ग्रामपंचायतीकडे ठराविक रक्कम जमा केली आहे. त्या सर्वांनाच 31 मार्चपूर्वी शौचालये दिली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यभरातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याशी संवाद साधला.

"स्वयंपूर्ण गोवा बनवताना पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होता कामा नये. गोवा मुक्तीच्या साठ वर्षानंतर वीज पाणी घर, शौचालय अशा मूलभूत सुविधांपासून कोणीही वंचित राहता कामा नये. अशा सुविधा नसलेल्यांचे सर्वेक्षण केले जावे. ज्यानी याआधीच सरकारी योजनेतून शौचालय मिळवण्यासाठी रक्कम भरली आहे त्या सर्वांना 31 मार्चपूर्वी शौचालय मिळतील अशी व्यवस्था केली जावी. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ यांच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाईल." असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले गोवा दौऱ्यावर -

आत्मनिर्भर भारताच्या धर्तीवर स्वयंपूर्ण गोवा तयार करण्यासाठी मनुष्यबळाचा विकास करावा लागणार आहे. गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी कशाची गरज आहे याचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र त्यात आणखीन प्रगती होण्याची गरज आहे. एक ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू आहे येत्या 19 डिसेंबर पूर्वी आपल्याला निर्धारीत लक्ष्य गाठायचे आहे. भाजीपाला, दुध, मांस, मासळी आणि जीवनावश्यक वस्तू यांच्या बाबतीत गोवा स्वयंपूर्ण झाला पाहिजे असे सरकारचे लक्ष्य आहे. यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.

संबंधित बातम्या