उद्या खांडोळा येथिल शांतादुर्गा देवीचा कालोत्सव

दैनिक गोमन्तक
रविवार, 10 जानेवारी 2021

येथील श्री. शांतादुर्गा देवीचा वार्षिक कालोत्सव सोमवार दिनांक ११ व मंगळवार दिनांक १२ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे .

खांडोळा  येथील श्री. शांतादुर्गा देवीचा वार्षिक कालोत्सव सोमवार दिनांक ११ व मंगळवार दिनांक १२ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे .
कोरोना महामारीचे गाम्भीर्य लक्षात घेऊन तसेच सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून  यंदाचा हा कालोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा महत्वपूर्ण  निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे . 

वार्षिक कालोत्सवानिमित्त सोमवार ११ रोजी सकाळी देवस्थानाच्या पुजाऱ्यातर्फे विविध धार्मिक विधी होईल,  दुपारी आरती , रात्रौ ११ वाजता ,वाजत गाजत बॅण्डबाजासह व दारू कामाच्या आतषबाजीने श्रींची मंदिरा सभोवती  पालखीतून मिरवणूक निघेल . दिनांक १२ रोजी पहाटे देवीची रथातून मिरवणूक होईल. वर्ष पद्धतीप्रमाणे पहिल्या दिवशी रातकाला व नाटक, तसेच दुसऱ्या दिवशीचा दुपारी सादर होणारा गवळणकाला यंदा रद्द करण्यात आला आहे याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी .  परंतु दुपारी ३ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे . तद्नंतर श्रींचे पालखीतून  स्नानासाठी देवस्थानच्या तळीकडे प्रयाण होतील. तसेच स्नानांतर देवीचे मंदिरात परत आगमन होणार असून लगेच पावणीने कालोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे .

संबंधित बातम्या