दिव्यांगांसाठी स्वयंपूर्ण गोवा योजनेखाली खास शिबिरांचे आयोजन

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

येत्या ४ डिसेंबर या दिव्यांगदिनापासून या शिबिरांना सुरवात केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

पणजी:  स्वयंपूर्ण गोवा योजनेखाली राज्यातील दिव्यांगांना लागणारी साधने आणि ओळखपत्रे देण्यासाठी खास शिबिरांचे आयोजन १२ तालुक्यात केले जाणार आहे. येत्या ४ डिसेंबर या दिव्यांगदिनापासून या शिबिरांना सुरवात केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले, की दिव्यांगाना उत्पन्नाचा आणि रहिवासाचा दाखला हवा असेल, तर तो शिबिराच्या ठिकाणीच उपलब्ध असेल. दिव्यांगाना लागणारी साधने अर्टिफिशीयल लिंब्स मॅन्युफॅक्चरींग कॉर्पोरेशन ऑप इंडिया (एलिम्को) यांच्या सहकार्याने दिव्यांगाना मदत योजना (एडीआयपी) देण्यात येणार आहे. या शिबिरात कोणती साधने हवी याची नोंद केली जाणार आहे.

सध्या ११ हजार ५०० दिव्यांगाना दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ दिला जातो. यापूर्वी २०१६ मध्ये घेतलेल्या शिबिरांत ५ हजार नवे दिव्यांग नोंद झाले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ही शिबिरे होत असल्याने आणखीन सहा हजार जणांची नव्याने नोंद होण्याची शक्यता आहे. शिबिरांना एकाचवेळी गर्दी होऊ नये यासाठी दूरध्वनी क्रमांक आधी जाहीर करून नोंदणी करून नंतर शिबिरासाठी किती वाजता यायचे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

संबंधित बातम्या