Padi Waterfall: बंगळुरू येथील पर्यटक पाडी धबधब्यात बुडाला

उडुपी येथील युवकाचा पाडी धबधब्यात अंत
Padi
PadiDainik Gomantak

मडगाव: गोव्यात सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या बंगळुरू येथील आदित्य शेट्टी (28) या युवकाला आज पाडी धबधब्यावर बुडून मृत्यू आला. हा युवक मूळ उडुपी येथील असून तो बंगळुरू येथील एका आयटी कंपनीत काम करत होता. आज आदित्य आपल्या मित्राबरोबर या धबधब्यावर आंघोळ करताना ही दुर्घटना घडली.

(tourisam from Bangalore drowned at padi waterfall)

Padi
Velsao: वेळसाव येथे विना परवानगी रेल्वे ट्रॅक सर्वेक्षणाचा प्रयत्न; नागरिक आक्रमक

युवकाचा मृतदेह जेव्हा पाण्यातून बाहेर काढला यावेळी त्याच्या पायाला एक साप वेटोळे घालून असलेला दिसून आला. यावेळी सापाने युवकाला दंशही केला होता असे आढळले. हे दोन्ही युवक दोन दिवसांपूर्वी गोव्यात आले होते आणि काणकोण येथील एका हॉटेलात उतरले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com