पेडण्यातील पर्यटनस्थळांचा पर्यटन व्यवसायाला वाव

निवृत्ती शिरोडकर
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

विकास करण्याची जर दूरदृष्टी असेल तर दगडातून जशी सुंदर सुबक मूर्ती तयार होऊ शकते त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कल्पकतेतून मांद्रे मतदारसंघात खिंड मोरजी आणि पार्से खाजन गुंडो बांधाचा जो पर्यटन नजरेतून विकास झाला त्या प्रकल्पाकडे पाहिल्यास नजरेचे पारणे फेडते.

मोरजी: विकास करण्याची जर दूरदृष्टी असेल तर दगडातून जशी सुंदर सुबक मूर्ती तयार होऊ शकते त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कल्पकतेतून मांद्रे मतदारसंघात खिंड मोरजी आणि पार्से खाजन गुंडो बांधाचा जो पर्यटन नजरेतून विकास झाला त्या प्रकल्पाकडे पाहिल्यास नजरेचे पारणे फेडते. त्याचे पूर्ण श्रेय माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना दिले तर वावगे ठरू नये. 

पर्यटकांना वाव देण्यासाठी अशी अविकसीत अनेक पेडणे तालुक्यात पर्यटन स्थळे आहेत. त्याचा विकास केला तर समुद्र किनाऱ्यापलीकडील पर्यटनस्थळांचा विकास होईलच. शिवाय त्या-त्या परिसरात स्थानिकांना लहानमोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सरकारने दूरदृष्टी ठेवून पेडणे तालुक्यातील नवीन पर्यटन स्थळांचा विकास करावा, त्यात केरी येथील जिवबादादा केरकर राजवाडा, पालये येथील संत सोहिरोबानाथ अंबिये निवासस्थान, हरमल येथील परशुराम टेकडी, गोड्या पाण्याचा तलाव, हळर्ण येथील किल्ला, पार्से येथील वायडोंगर, पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक, मालपे येथील मूळवीर देवस्थान परिसर अशी अनेक नवनवीन पर्यटनस्थळे आहेत. त्याचा विकास केला तर दुहेरी फायदा होवू शकतो.

पेडणे तालुक्यात दरवर्षी पर्यटन हंगामात लाखो पर्यटक विविध स्थळांना भेटी देत असतात. हेच पर्यटक नवनवीन पर्यटन स्थळे शोधात असतात. 

नवीन स्थळाचे पर्यटकांना आकर्षण असते. किनारे हल्ली वेगवेगळ्या कारणामुळे बदनाम होत असल्याने पर्यटक शान व नवीन स्थळाकडे आकर्षित होत असतात. त्यासाठी सरकारने आणि पेडणे तालुक्यासाठी पूर्णपणे पर्यटन खाते दोन्ही लोकप्रतिनिधीच्या हातात असल्याने कोणतीच गोष्ट अशक्य नाही. पेडणे मतदारसंघाचे आमदार बाबू आजगावकर यांच्याकडे पर्यटन खाते आहे आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे पर्यटन विकास महामंडळ आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांनी हातात हात घालून पेडणे तालुक्याचा पर्यटन नजरेतून विकास करावा, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या