पर्यटन विकास महामंडळाचा गेस्ट हाऊस प्रकल्प रखडला

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

साळावली धरणाच्या काठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतलेल्या गेस्ट हाऊस प्रकल्प गेल्या पाच वर्षा पासून रखडत पडला असुन पूर्वी ज्या ठिकाणी विश्रामधाम होते त्या जागी लांबलचक बांधकाम हाती घेण्यात आले होते. पायाभरणी करून जेमतेम मिटरभर उंच बांधकाम केल्या नंतर बंद करण्यात आलेले काम अद्याप परत सुरु करण्यात आलेले नाही.

सांगे : साळावली धरणाच्या काठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतलेल्या गेस्ट हाऊस प्रकल्प गेल्या पाच वर्षा पासून रखडत पडला असुन पूर्वी ज्या ठिकाणी विश्रामधाम होते त्या जागी लांबलचक बांधकाम हाती घेण्यात आले होते. पायाभरणी करून जेमतेम मिटरभर उंच बांधकाम केल्या नंतर बंद करण्यात आलेले काम अद्याप परत सुरु करण्यात आलेले नाही. गेले पाच वर्षे प्रकल्प बांधण्या साठी वापरण्यात आलेल्या  लोखंडी सळ्या पावसात गंजून गेल्या आहे. केवळ दोन सुरक्षा रक्षक देखरेख करीत आहे. सांगेत पर्यटन वृद्धी साठी हा प्रकल्प महत्वाचा होता. या गेस्ट हाऊस प्रकल्पा बरोबर गेल्या वीस वर्ष्या पासून पाच बंगले बांधून वापराविना ओसाड सोडण्यात आले होते. त्याची दुरुस्ती करून सुद्धा किरकोळ कामाविना परत तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

       सांगेत पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी सांगे पासून नेत्रावळी पर्यंत खूपशी पर्यटन स्थळे आहेत. पर्यटक दिवसभर फिरून आनंद घेऊ शकतात पण एकदोन दिवस विसावा घेण्यासाठी कोणताही पर्याय नाही त्या मुळे साळावली धरण आणी बोटॅनिकल गार्डन च्या सानिध्यात गोवा पर्यटन विकास महामंडळाचा हा गेस्ट हाऊस प्रकल्प पर्यटकांना आणी सांगेतील पर्यटनाला नक्कीच चालना देण्यासाठी उपयुक्त असा होता. पण काम सुरु करून जेमतेम वर्ष भरात काम बंद करण्यात आले. ते आज पर्यंत सुरु करण्यात आलेले नाही. हाच प्रकल्प नव्हे तर सांगेत सुरु केले जाणारे सर्वच प्रकल्प असे रखडत राहिले आहे. 

       साळावली धरण आणी त्या खाली असलेल्या बॉटनिकल प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकाना सद्या कोणतीही सुविधा नाही. यंदा कोरोना महामारी मुळे पर्यटकांना पर्यटन स्थळे बंद असली तरी सरासरी वार्षिक भेट देणाऱ्या पर्यटक आणी सहली साठी येणाऱ्या मुलांचा  आकडा मिळून लाखभर होत आहे. धरण भरल्या नंतर पर्यटकांचा ओढा मोठया प्रमाणात लागलेला असतो. पण कोणतीही सुविधा नसल्याने पर्यटक आल्या पावली निघून जातात. पर्यटन विकास महामंडळाने जर हा प्रकल्प वेळीच पूर्ण केला असता तर पर्यटकांची सोय झाली असती. पर्यटक एक दोन दिवस वास्तव्य करून राहिल्यास दळण वळण सहित सांगेतील व्यापार उद्योगाला बहर आला असता. 

       सांगेत येणाऱ्या पर्यटकांना शनिवारी नेत्रावळीतील पर्यटन स्थळांना भेटी देऊन धरण काठावर हा प्रकल्प साकारल्यास एक रात्र विसावा घेऊन दुसऱ्या दिवशी साळावली धरण आणी बॉटनिकल गार्डन प्रकल्पाचा आस्वाद घेणे शक्य झाले असते. त्या मुळे संपूर्ण सांगे भागाला पर्यटन व्यवसाय जोमात आला असता. सुट्टी आणी इतर दिवसात होणारी गर्दी आणी येणाऱ्या सहली यांचा हिशोब पाहता चांगला पर्यटन व्यवसाय होऊ शकतो. मात्र एकदा बंद पडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाला अपयश आले आहे.  २०१६ साली या गेस्ट हाऊस च्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती ते काम जेमतेम वर्ष भरात बंद पडले. याला टेकूनच याच पर्यटन महामंडळाने विस वर्षा पूर्वी पाच डुप्लेक्स बंगले बांधले होते त्याचे उदघाटनही न करता तसेंच टाकून दिले होते. 

संबंधित बातम्या