
Mapusa: औषधी गुणधर्मयुक्त असलेल्या नैसर्गिक पोंबुर्फा झरीचे 2010 मध्ये सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर या झरीची देखभालीअभावी स्थिती सध्या बिकट झाल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्र्यांनी सोमवारी (ता.१५) स्थानिक आमदारांसह या स्थळास भेट देत पाहणी केली.
पंचायतीला झरीच्या नूतनीकरणासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यास त्यांनी सांगितले असून या झरीला स्वयं-शाश्वत मॉडेल बनविणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. झरीस्थळी शौचालयाची काही प्रमाणात दुरवस्था, पार्किंगची व्यवस्था तसेच सुरक्षिततेसाठी पाळत ठेवण्याची आवश्यकता आहे.
झरीस्थळी आवश्यक सुधारणा तसेच इतर सुविधांविषयी सल्लागाराला सांगून स्थानिक आमदारांशी चर्चा करून पुढील दोन महिन्यांपर्यंत कामाची निविदा काढण्याचा प्रयत्न असेल, असेही खंवटे म्हणाले.
सोयीसुविधा पुरविण्याची मागणी
झरीस्थळी पार्किंगची उणीव आहे तसेच शौचालयाची स्थिती व लहान मुलांसाठी असलेली उद्यानातील खेळणी खराब झाली आहेत. तीही बदलण्याची मागणी उपस्थित नागरिकांनी पर्यटनमंत्र्यांसमोर केली.
त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी बाकडे घालण्याची मागणी आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी केली. तसेच काहीजण इथे येऊन दारू पितात त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दिवसा व रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी उपस्थितांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.