पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या  सोडविण्यासाठी उपसभापती तत्पर

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्र्यांनी पर्यटन व्यवसायासंबंधीत किनारी व्यवस्थापन, वीज खाते, पर्यटन खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून शॅक्स पॉलिसी सुटसुटीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

काणकोण : काणकोणमधील खासगी जमिनीत पर्यटन व्यवसाय करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी आपली कैफीयत मांडल्यानंतर सामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे  काणकोणचे आमदार व उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी लागलीच मुख्यमंत्र्यांची भेट निश्र्चित करून त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या याचा फायदा उर्वरीत पर्यटन व्यावसायिकांनाही होणार आहे. मात्र, सुरवात उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यटन व्यवसायासंबंधीत किनारी व्यवस्थापन, वीज खाते, पर्यटन खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून शॅक्स पॉलिसी सुटसुटीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीचा पर्यटन हंगाम नुकसानीत गेला आहे. नव्यानेच या व्यवसायात पदार्पण केलेले बेरोजगार युवक कर्जबाजारी ठरले आहेत. त्यासाठी किमान यंदा या व्यवसायात जम बसवून स्थिरस्थावर होण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांना सरकारने पाठबळ देण्याची गरज आहे. ही बाब उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली आहे. यावेळी उपसभापती फर्नांडिस यांच्यासमवेत भाजपचे मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, खासगी शॅक मालक असोसिएशनचे अध्यक्ष धर्मेंद्र सागलानी, सायमन रिबेलो व अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या