पर्यटन महामंडळातर्फे पर्यटनाला चालना

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

 स्वदेश दर्शन योजनेंतर्गत २०० कोटींपेक्षा जास्त निधीचा वापर 

मोरजी: पर्यटन क्षेत्राला वाव देण्यासाठी आणि नवनवीन पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त निधीचा वापरत करून विकास केला जाईल अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे आपण पर्यटन विकास महामंडळाचा ताबा घेतल्यानंतर आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला.

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना सांगितले की, आतापर्यंत किमान २२८ कोटींची कामे राज्यात केली आहेत. पर्यटनाला वाव देण्यासाठी आणि पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी नवीन पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल असे सांगितले.

पेडणे तालुक्याचा विचार केल्यास आमदार दयानंद सोपटे तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर पार्से येथील श्री भगवती मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. राज्यातील एक आकर्षित असे मंदिर हे पर्यटकाना खेचून आणेल असे नियोजनबद्ध काम आमदार सोपटे रात्रंदिवस लक्ष देऊन करत आहेत. त्यावर चार कोटी ५९ लक्ष रुपये खर्च करण्यात येत आहे.

मांद्रे येथील स्वामी सिद्धारूढ मठ आणि श्री भूमिका देवी मंदिर पालये या परिसराचे सुशोभिकरणावर १ कोटी ९ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. केरी येथील श्री रवळनाथ मंदिर परिसराच्या सुशोभिकरणावर ३ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. पेडणे येथील श्री भगवती मंदिर परिसराचे सुशोभिकरणावर दोन कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कोरगाव पंचायत क्षेत्रातील दाडेश्वर मंदिर, तळी  सुनी मशीद यावर एकूण ३ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.हणखणे येथील भराडी मंदिर व सातेरी मंदिर इब्रामपूर या मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यावर ३ कोटी २६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सावंतवाडा मांद्रे येथील भूमिका मंदिर परिसराचे रोषणाई व सुशोभिकरणावर १ कोटी ७८ लाख खर्च करण्यात येणार आहेत.आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी मांद्रे मतदार संघातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून राज्याबरोबरच मतदार संघात पर्यटन विकास महामंडळामार्फत विकासात्मक प्रकल्प राबवताना बेरोजगारीचा प्रश्नही सोडवण्याचे प्रयत्न असतील.

समुद्रकिनाऱ्यापलीकडील पर्यटनाला वाव देण्यासाठी स्वदेश दर्शन योजनेंतर्गत एकूण चाळीशी मतदार संघात प्रकल्प राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे . मान्द्रे किनारी भागात पोलीस चौकी , वीज उपकेंद्र, रवींद्र कला भव, किनारी शोचालायाची सोय, भूमिगत वीज वाहिन्या, तेरेखोल केरी अर्धवट असलेल्या पुलाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले .

मतदारसंघाबरोबरच राज्यात राबवलेले प्रकल्प
गोवा पर्यटन विकास महामंडळ मार्फत मांद्रे मतदार संघात आणि राज्यात प्रकल्प उभारले त्याची माहिती देताना सांता मोनिका जेटी परिसराच्या सुशोभिकरणावर ५ कोटी तीन लाख रुपये , हणजुणा  सुशोभिकरण तसेच बोडगेश्वर मंदिर रस्ता ते संकलेश्वर वेर्ला काणका सात कोटी त्रेसष्ठ लाख रुपये खर्च, दक्षिण गोव्यातील किनारी भागात शौचालय सुशोभीकरण करण्यावर चार कोटी ब्याऐशी लाख व उत्तर गोव्यात चार कोटी ब्याऐंशी लाख रुपये, हायमास्ट भूमिगत केबल व विद्युत रोषणाई तिरामळ सर्कल तीन कोटी सदतीस लाख, काणकोण येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसराचे सुशोभिकरण तीन कोटी पंचवीस लाख, सालीगाव चर्च परिसर विकास व सुशोभिकरण दोन कोटी साठ लाख रुपये, अवर लेडी रेमेडियस चर्च नेरुल परिसराचे सुशोभिकरण एक कोटी एकसष्ट लाख, काकोडा येथील महादेव मंदिर सुशोभिकरण ५६ लाख , सावईवेरे आर सीपीआर एज्युकेशन टॉयलेट ब्लॉक चोवीस लाख रुपये, पर्यटन भवन सुविधा दोन कोटी बावीस लाख, हिन्टरलँड कुडचडे बसस्थानक जवळ सहा कोटी चौसष्ट लाख, मंगेशी म्युझियम दोन कोटी सतरा लाख,  कळंगुट बागा रस्ता सुशोभिकरण एकोणसाठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काही प्रकल्पांचे टेंडर झाले आहे. कामाची ऑर्डर मिळाली नाही, जवळ जवळ दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करून कामे चालू असल्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी 
सांगितले.

संबंधित बातम्या