गोमंतकीयांना लसीचा पहिला डोज मिळेपर्यंत पर्यटन क्षेत्र खुले केले जाणार नाही

गोमंतकीयांना लसीचा पहिला डोज मिळेपर्यंत पर्यटन क्षेत्र खुले केले जाणार नाही
Pramod Sawant

पणजी: गोव्यातील(Goa) प्रत्येक नागरिकाला कोविड प्रतिबंधात्मक(Covid-19) लसीची पहिली मात्रा(Vaccination) मिळेपर्यंत गोव्यातील पर्यटन(Tourism) क्षेत्र खुले केले जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत(Cm Pramod Sawant) यांनी आज दिली. गोव्यात सध्या राज्यव्यापी संचारबंदी आहे यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आलेली आहेत.(The tourist area will not be opened until the first dose of vaccine is given to the Gomantakiy)

गोव्यामध्ये छोटी-मोठी मिळून सुमारे दोन हजार हॉटेल्स आहेत ती सध्या बंद आहेत. कसिनो, जलक्रीडा प्रकार यावर सध्या बंदी आहे. गोवा सरकारने संचार बंदी 21 जून पर्यंत सध्या वाढवलेली आहे. एक ऑक्टोबरपासून पर्यटनाचा नवा हंगाम सुरू होतो. त्याआधी पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर देशी पर्यटक गोव्यात येत असतात. त्यामुळे पर्यटन क्षेत्र खुले करावे अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून सरकारकडे अधून मधून केली जात आहे. गेल्या आठवड्यात पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय आदींसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेतला होता. सरकार संचारबंदी नंतर पर्यटन क्षेत्र खुले करेल अशी चर्चा होती.

याबाबत आज मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की गोव्यातील प्रत्येक नागरिकाला लस्सी ची पहिली मात्रा मिळेपर्यंत पर्यटनक्षेत्र खुले केले जाणार नाही. प्रत्येक नागरिकाला 31 जुलैपर्यंत लस मिळेल अशी व्यवस्था सरकार करत आहे. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यभरात सुरू करण्यात आलेला आहे.

देशात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्यानंतर सुरुवातीला या संकटापासुन दुर असलेल्या गोव्यात नंतर मात्र गंभीर परिणाम दिसले. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने 'सुरक्षित गोवा' ही प्रतिमा मलिन झाली आहे. राज्याची प्रतिमा उजळण्यासाठी आता सरकारने मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली पाहिजे, असे टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवाने सरकारला निवेदनाद्वारे सुचवले होते.

कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली संरक्षित स्मारके आणि संग्रहालये आजपासून खुली होत असली तरी संचारबंदीच्या (Curfew) कारणावरून गोव्यातील (Goa) सर्व स्मारके आणि संग्रहालये 21 जून पर्यंत बंद राहणार आहेत. यात भारतीय पुरातत्व विभाग (Department of Archeology of India) ,गोवा पुरातत्व विभाग (Goa Archaeological Department) यांच्या अखत्यारीत असलेली सर्व स्मारके, संग्रहालये आणि खाजगी संग्रहालये सुद्धा 21 जून पर्यंत बंद राहणार आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com