पर्यटकांनो गोव्यात पर्यटनाला येवू नका

Priyanka Deshmukh
शुक्रवार, 7 मे 2021

यावर गोमंन्तकने गोव्यातील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा ते म्हणाले की, दिवसेंदिवस राज्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लॉकडाऊन हे त्याचेच उदाहरण आहे. कोविड बेडची कमतरता देखील भासू शकते असा अंदाजही वर्तविला जात आहे. त्यामुळे आम्हाला उत्पन्न नाही मिळालं तरी पर्यटकांनी आता जरा थांबावं. 

दुसऱ्या लाटेत हळूहळू राज्यात कोरोनाने(corona) पुन्हा हातपाय पसरायला सुरवात केली. गोव्यात आता तर रूग्णसंख्येचे प्रमाण वाढत असतानाच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. मात्र तरी देखील अगदी अलिकडेपर्यंत म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत गोवा सरकारने महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातली नव्हती. पर्यटकांसाठी(Tourist)गोव्याचे(Goa) दरवाजे राज्य सरकारने खुले ठेवले होते. का तर गोव्याची रोजी-रोटीचं पर्यटन आहे. रोजगाराच्या संधी देखील त्यामुळेच उपलब्ध आहेत. पण आता मात्र खुद्द गोयेकरांनी पर्यटकांना गोव्यात न येण्याचे आवाहन वजा विनंती केली आहे.(Tourist Not allowed to enter Goa for Tourism says Local People) 

यावर गोमंन्तकने गोव्यातील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा ते म्हणाले की, दिवसेंदिवस राज्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लॉकडाऊन हे त्याचेच उदाहरण आहे. कोविड बेडची कमतरता देखील भासू शकते असा अंदाजही वर्तविला जात आहे. त्यामुळे आम्हाला उत्पन्न नाही मिळालं तरी पर्यटकांनी आता जरा थांबावं. 

गोव्यात सध्या कुठल्या ‘स्ट्रेन’चा फैलाव झालाय;  ‘एन440के’ की ‘आंध्र प्रदेश स्ट्रेन’? 

"गोव्यातील कोलवा बीच अतिशय फेमस आहे. त्यामुळे पर्यटक गोव्यात निसर्गाचा आनंद घ्यायला येतात, पण यावेळी पर्यटक कोरोनाला विसरून गेले आणि समुद्र किनाऱ्यावर मास्क न घालता, सॅनिटायझर चा वापर न करता, सोशल डिस्टन्स न पाळता सुसाट फिरत होते. दुसऱ्या बाजूला कोलवा गावचे लोक मात्र मास्क वापरून बाहेर फिरत होते, नियमांचे पालन करत होते. तरीही आमच्या गावची कोरोना रुग्णसंख्या 300 वर पोहचली आहे. पर्यटकांमुळेच गोव्यात कोरोना वाढला आहे. राज्यात येताना RTPCR टेस्ट सक्तीची करणे गरजेचं आहे, हा निर्णय मागच्या महिनापूर्वीच घ्यायला हवा होता," असे कोलवाचे सरपंच आंतोनियो फर्नांडिस यांनी सांगितले.

"कोरोना कुठेच अस्तित्वात नाही असा विचार करून पर्यटक गोव्यात फिरत होते. 98% पर्यटक आल्यानंतर मास्क घालत नव्हते. कोरोना आहे हे पुर्णपणे विसरून गेले होते. गोव्यात कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आम्ही देखील पर्यटकांना कुठलेली निर्बंध न घालता वेलकम करत गेलो त्यामुळे आज आम्हा गोयेकरांने हा दिवस बघावा लागत आहे. यामुळे थोडेच नाही तर मोठे नुकसान गोव्याच्या स्थानिक लोकांचे झाले आहे. कारण आता विचार केला तर परिस्थिती खूप गंभीर तर आहेच पण त्याच बरोबर हाताबाहेर ही गेली आहे. आम्हाला पर्यटकांमुळे फायदा झाला पण, आम्ही त्यावेळी फक्त आमच्या बिजनेसचा विचार केला, दुसरी बाजू बघितलीच नाही ती बाजू आम्ही आता बघत आहोत. आणि त्याचे परिणामही भोगत आहोत. आता राज्यात वाढणारी रुग्णसंख्या कशी कमी करता येईल यावर विचार करणं महत्वाचं आहे जाती धर्म विसरून एकमेकांना मदत करण्याची आता गरज आहे," असे ऑल गोवा शॅक असोसिएशनचे प्रेसिडेंट क्रूझ कार्दोझ यांनी सांगितले.

आम्ही प्रचंड मानसिक तणावाखाली आहोत; जीएमसी डॉक्टर्स 

"लोकांना सुट्टी मिळाली की ते गोव्यात येऊन मजा करण्याची योजना आखतात. गोव्याचं देखील उत्पन्न याच पर्यटनावर आहे. त्यामुळेच गोव्यात येण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक तमिळनाडू अशा सगळ्यांच राज्यांसाठी सीमा खुल्या ठेवल्या होत्या. पण त्याच परिणाम आत गोयेकरांच्या आरोग्यावर झाला आहे. पर्यटकांना गोव्यात कुठेच बंधनच घातले गेले नाही, रजनी पार्ट्या सुरू राहल्या, आणि कोरोनानं आपलं काम सुरु केलं. त्याच बरोबर मागील 15 दिवसात झालेली निवडणूक आणि प्रचारादरम्यान काढण्यात आलेल्या रॅली यामुळे देखील गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली. अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नात आम्ही आरोग्य यंत्रणेवरचे ओझे वाढविले आहे," तर असे उद्योजक प्रशांत यांनी सांगितले.

राज्यात काल दिवसभरात 7518 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 3869 (51.46 टक्के) जण संक्रमणित सापडले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण मृत्यूची संख्या दीड हजारावर (1501) वर पोहोचली आहे, तर राज्यातील कोरोना संक्रमणित असलेल्या रुग्णांची संख्या 29,752 झाली आहे. मडगाव आरोग्य केंद्र क्षेत्रामध्ये सर्वाधिक (2253) रुग्ण कोरोना बाधित आहेत. त्यापाठोपाठ डिचोली, सांखळी, म्हापसा, पणजी, कांदोळी, चिंबल, शिवोली, पर्वरी, कांसावली, कुठ्ठाळ्ळी व फोंडा या क्षेत्रात एक हजाराहून अधिकजण संक्रमणित आहेत.

संबंधित बातम्या