Goa cashew: परराज्यातील व्यापाऱ्यांची गोव्याच्या काजू बाजारपेठेत घुसखोरी

पर्यटकांची होतेय फसवणूक; कमी दर्जाचा काजू माथी मारण्याचे प्रकार
Cashew in Goa
Cashew in Goa Dainik Gomantak

(Goa cashew) पणजी : राज्यात काजू विक्री व्यवसायात परराज्यातील व्यापाऱ्यांनी केलेली घुसखोरी, ही त्यात मिळणाऱ्या बक्कळ नफ्यांच्या आमिषापोटी असल्याचे स्पष्ट आहे. सरसकट काजू खरेदी करून त्याचे वर्गीकरण करून विविध दराने काजूची विक्री होते. राज्यात येणाऱ्या पर्यटकांचा फायदा घेऊन त्यांच्या माथी कमी दर्जाचा काजू मारण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असलेल्या दुकानांसाठी लाखो रुपये भाडे देण्याची तयारी दर्शवीत परराज्यातील व्यापाऱ्यांनी ग्राहकांना लुबाडण्यासाठी मोठमोठी दुकाने थाटलेली दिसतात.

Cashew in Goa
Revolutionary Goans : नेत्यांच्या भेटीगाठींचा गुंता सुटला; मनोज परबांनी सांगितलं खरं कारण

महापालिकेच्या मालकीच्या मार्केट इमारतीतही काजूच्या आणि ड्रायफ्रूट विक्री व्यवसाय करणाऱ्यांनी दुकान थाटले आहे. हे दुकान खरेतर गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या यादीनुसार स्थानिक व्यक्तीच्या नावे आहे. परंतु त्या दुकानातून जर लाखो रुपये भाड्यापोटी मिळत असतील, तर त्याच्या आमिषाला अशी दुकानवाली मंडळी बळी पडलेली सर्रास दिसतात. विशेष म्हणजे मार्केट इमारतीत ज्यांच्या नावे दुकान आहे, ती व्यक्ती महापालिकेशी भाडेकरार न झाल्याने कोणतेही भाडे देत नाही, अशी माहिती पुढे आली आहे.

त्यामुळे सरकारी दरबारी एक नवा पैसा न करता भाड्यापोटी लाखो रुपये मिळत असल्याने अशा दुकान मालकांचा कल त्याकडेच आहे. अलीकडे ड्रायफ्रूट विक्रीची मोठी दुकाने पर्यटकांना लुभावत असून, त्याठिकाणी मिळणारा काजू हा गोव्यातील काजू म्हणून खरोखरच विकला जातो का? याची विचारणा झाली तरी हाच काजू म्हणून उत्तर दिले जाते.

या काजूची प्रतवारी तपासण्यासाठी असणारी सरकारी यंत्रणेने ज्या गतीने काम करायला हवे होते, त्या गतीने ते काम होत नाही. दैनिक ‘गोमन्तक’ने आवाज उठवल्यानंतर कळंगुट आणि कांदोळी भागातील काजूची तपासणी झाली, पण राजधानीतील किती दुकानांतील काजूचा दर्जा तपासला, हे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाच माहीत.

Cashew in Goa
Mauvin Gudino: गोमंतकीयांच्या सेवेत आणखी 250 ई-बस होणार दाखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रातील ६० टक्के दुकानदारांनी अद्याप व्यवसाय परवाना नोंदणीचे नूतनीकरण करून घेतलेले नाही. यात ड्रायफ्रूट विक्री करणाऱ्या दुकांनाचाही समावेश असले तरी त्या दुकानांचे मूळ मालक वेगळे आहेत.

त्वरित कृतीची गरज

एकदा माल खरेदी केल्यानंतर ग्राहक आपल्या घरी परतल्यानंतरच त्याचा दर्जा तपासतो. त्यावेळी पर्यटकांना आपली फसवणूक झाल्याचे समजते. पर्यटक किंवा ग्राहकांना न्याय मागण्यासाठी अन्न व औषध प्रशासन किंवा ग्राहक न्यायालय आहे. पर्यटन खात्याने लुबाडणूक, फसवणुकीविषयीच्या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ त्या प्रकरणाचा निपटारा करणारी यंत्रणा एफडीएच्या सहयोगाने उभारली तर पर्यटकांचा विश्‍वास येथील सरकारवर वाढू शकतो. त्यासाठी त्वरित कृतीच गरज आहे, असे येथील एका मानांकित काजू व्यावसायिकाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com