पर्यटकांचे स्वागत! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

"गोवा राज्यात प्रवेश करणार्‍यांना पर्यटकांची कोविड -19 नकारात्मक चाचणी सक्तीची करण्यात येणार नाही अशा प्रकारच्या कारवाईमुळे राज्याला न परवडणारे आर्थिक नुकसान होऊ शकते,"असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितले.

पणजी: देशात कोरोनाचा वाढता प्रसार बघता अनेक राज्यांमध्ये कोरोना निर्बंध लागू केले आहे. अनेक राज्यात कोरोना वाढत असतांना गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ राज्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना कोविड 19 ची नकारात्मक चाचची प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र गोव्यात पर्यटकांचे विनानिर्बंध स्वागत केले जात आहे. "गोवा राज्यात प्रवेश करणार्‍यांना पर्यटकांची कोविड -19 नकारात्मक चाचणी सक्तीची करण्यात येणार नाही अशा प्रकारच्या कारवाईमुळे राज्याला न परवडणारे आर्थिक नुकसान होऊ शकते,"असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितले.

"मुख्यमंत्र्यांना या संबधी नियमांची 'फाईल पाठविली आहे', गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड 19 ची नकारात्मक चाचणी करण्यावर विचार विनिमय होणार आहे," असे सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माध्यमांना सांगितले  होते.

गोमंतकीय तरुण-तरुणींना गोवा सरकारकडून मुख्यमंत्री पाठ्यवृत्ती योजनेची भेट; असे असणार मासिक वेतन 

“गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी तसच राज्यातील पर्यटकांसह आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आम्ही पुन्हा एकदा सर्व आर्थिक प्रक्रिया बंद करू शकत नाही. आम्ही कोरोना चाचण्यांचा वेग वाढवला आहे. त्याचबोरबर सर्वांना सामाजिक अंतर पाळण्यास कायम मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करण्यास विनंती करत आहोत. मी आरोग्यमंत्र्यांच्या सतत संपर्कात असतो. आता चाचणी घेण्याखेरीज दुसरा कोणताही मोठा निर्णय होणार नाही. ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांनी स्वत: ची चाचणी करून घ्यावी आणि जे पात्र नागरीक आहेत त्यांनी लसीकरण करायला हवे. असे ”सावंत म्हणाले.

मागील अर्थसंकल्पातील किती घोषणांची पूर्ती किती झाली ? कामतांचा सवाल 
गोव्यात कोरोना प्रकरणामध्ये वाढ दिसून आली आहे आणि सक्रिय प्रकरणांची संख्या आता 1017 वर वाढली आहे. काही आठवड्यांपूर्वी सक्रिय प्रकरणांची संख्या 700 पेक्षा कमी होती. राज्याच्या पर्यटन उद्योगाने अशी भीती व्यक्त केली होती की, राज्यात येण्यावरील कोणत्याही निर्बंधामुळे गोव्यात होणाऱ्या उत्सवावर परिणाम होवू शकतो. 

संबंधित बातम्या