गोव्यातील किनाऱ्यावर पर्यटकांचे लोंढे!

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

नाताळाची सुट्टी आणि पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या नूतन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

पणजी: नाताळाची सुट्टी आणि पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या नूतन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. गोव्यातील किनारे सध्या पर्यटकांनी फुल्ल झाले असल्याचे चित्र आहे.

यात देशी पर्यटकांचा मोठा वाटा असून, महाराष्ट्रातून मुंबई, पुण्याहून लोक वाहने घेऊन किनारी भागात दाखल झाल्याचे दिसत आहेत. गर्दीमुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असून, काही पर्यटक मात्र मास्क घालून फिरताना दिसतात. बरेचजण मात्र मास्कविकानाच फिरतात. शुक्रवारी नाताळाच्या दिवशी उत्तर गोव्यातील प्रसिद्ध अशा कळंगुट किनाऱ्यावर झालेल्या गर्दीतून पर्यटकांचा गोव्याकडे असलेला ओढा सर्व काही सांगून जात आहे.(

संबंधित बातम्या