पर्यटकांमुळे गोमंतकीयांच्या जीवितास धोका

Tourists endanger the lives of cowherds
Tourists endanger the lives of cowherds

म्हापसा : टाळेबंदी उठवल्यानंतरच्या काळात गोवा राज्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत; तथापि, पर्यटकांच्या या वाढत्या संचारामुळे स्थानिक लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, अशा प्रतिक्रिया गोमंतकीय व्यक्तींकडून सररासपणे व्यक्त केल्या जात आहे.


व्यावसायिकांच्या वाढत्या दबावापुढे गोवा सरकारने पर्यटकांच्या विमुक्त संचाराला परवानगी दिल्याने राज्य सरकार गोमंतकीयांच्या जीवनाशी खेळत आहे, हे प्रत्ययास येते, असे मत काही व्यक्तींनी व्यक्त केले आहे. अशा प्रकारे सरकारने हतबलतेने व्यवसायिकांपुढे नतमस्तक न होता, ‘कोविड,१९’ गोव्यातून पूर्णत: हद्दपार हाईपर्यंत पर्यटन व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देणे अतिशय धोकादायक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.


साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीनंतर आता पर्यटक मौजमजा करण्यासाठी गोव्यात पुन्हा मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे पर्यटनविषयक व्यवसायांशी निगडित असलेल्या व्यक्तींना आर्थिक उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले असले तरी, त्यामुळे अप्रत्यक्षपणे गोवा राज्याला धोका आहे, याचे भान सरकारने ठेवायला हवे, असे म्हापसा येथील एक नागरिक पवन नागवेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. कोविडबाधित असलेल्या एखाद्या जरी पर्यटकाने गोव्यात प्रवेश केला तरी त्याचे दूरगामी परिणाम गोमंतकीयांना भोगावे लागणार आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने या बाबतीत आतताईपणा करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.


अन्य काही गोमंतकीय नागरिकांनी या विषयासंदर्भात बोलताना सांगितले, की जिवाचा गोवा करण्याच्या धुंदीत असलेले बहुतांश पर्यटक सामाजिक सुरक्षा नियम धुडकावून मौजमजा करण्यात मग्न आहेत. असे पर्यटक सॅनिटायझर न वापरणे, मास्क न वापरणे, सामाजिक सुरक्षा नियमांचे परिपालन न करणे, हेल्मेट न घालता वाहन चालवणे अशा कृती करीत आहेत. त्यांची ही वृत्ती गोमंतकीयांच्या दृष्टीने धोकादायक आहे; तथापि, शासकीय यंत्रणाही अशा पर्यटकांवर कारवाई करण्याचे टाळत आहे, असे प्रत्ययास येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com