नेत्रावळी येथील धबधब्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड

नेत्रावळी येथील पर्यटकांना सतत आव्हान देणारा सावरी हा धबधबा सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
Netravali Water Fall
Netravali Water FallDainik Gomantak

नेत्रावळी येथील पर्यटकांना सतत आव्हान देणारा सावरी हा धबधबा सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा धबधबा बाराही महिने वाहत असल्याने इथे दरवर्षी हजारो पर्यटक निसर्गचा आस्वाद मनमुराद घेत असतात.

(Tourists flock to the waterfall at Netravali)

Netravali Water Fall
आता घर बसल्या वीज बिल भरा!

नेत्रावळी क्षेत्रात तीन धबधबे आहेत,पाली,मैनापी आणि सावरी. यापैकी सावरी धबधब्या वर जाण्यासाठी नेत्रावळी वन्यजीव अभयारण्यच्या प्रमुख फाटका वरून सहा किलोमीटर अंतरावर जावे लागते व तिथून दीड किलोमीटर अशा अंतरावर चालत जावे लागते. आत जाण्यासाठी पर्यटकांना प्रत्येकी शंभर ते दीडशे रुपया पर्यंतची तिकीट काढावी लागते.

अभयारण्य असल्यामुळे लोकांना दारू किंवा सिगरेट अशा वस्तू धबधब्यावर घेऊन जाण्यासाठी सक्ती असल्याने वनरक्षक प्रत्येक गाडीची फाटकावर तपासणी करून गाड्या आत मध्ये सोडतात. तसेच धबधब्यावर प्लास्टिक किंवा कचरा फेकण्यास पण सक्त मनाई आहे. धबधब्यापर्यंत जाताना तीनशे ते चारशे पायऱ्या उतरून जावे लागते. तसेच पर्यटकांची काळजी घेण्यासाठी दोन ते तीन वन रक्षक पण या धबधब्याजवळ पहारा देत असतात. सुट्टीच्या दिवशी या धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com