Bicholim News: पर्यटकांच्या गर्दीने साळ बंधारा 'फुल्ल'! राज्यासह विविध भागातील पर्यटक दाखल

पर्यटकांची गर्दी : कुटुंबासह लुटतात उन्हाळी पर्यटनाची मजा
Sal dam, goa
Sal dam, goa Dainik Gomantak

डिचोली : उन्हाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि मध्यंतरी वादाचा विषय बनलेल्या साळ येथील शापोरा नदीवरील बंधाऱ्यावर पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. ‘मिरगा’चा पाऊस जवळ आला, तरी यंदा अजूनही डिचोली तालुक्यातील या साळ बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर हा बंधारा पर्यटकांच्या गर्दीने ‘फुल्ल’ होत आहे. राज्यातील विविध भागातील पर्यटकांसह शेजारील राज्यातील पर्यटकही या बंधाऱ्यावर उन्हाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी येत असल्याचे आढळून येत आहे.

Sal dam, goa
Bicholim News : डिचोलीत ‘निमुजग्या’कडे टाकतात कचरा; कारवाई अटळ

उकाडा असह्य झाला आणि अंगाची लाही-लाही होऊ लागली की प्रत्येकाला शीतल पाण्याचा गारवा हवाहवासा वाटतो. आणि मग प्रत्येकाला नदी, बंधारे, झरे आदी जलस्रोत खुणावू लागतात. यंदा हवामानात कमालीचा बदल झाला आहे. उष्णतेने तर कहर केला आहे. त्यामुळे यंदा वेगवेगळ्या भागातील जालस्रोत गजबजू लागले आहेत.

शापोरा नदीवर साळ येथे बांधलेला बंधारा हा एक मोठा बंधारा आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा बंधारा उन्हाळी पर्यटनासाठी प्रकाशझोतात आला आहे. स्थानिकांसह राज्याबाहेरील पर्यटकांना हा बंधारा आकर्षित करतो. मध्यंतरी काही अतिउत्साही युवकांकडून मद्यप्राशन, हुल्लडबाजी आदी गैरप्रकार वाढल्याने हा बंधारा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

Sal dam, goa
Bicholim News : घरावर झाड कोसळले; सुदैवाने आईसह मुलगा बचावला

या बंधाऱ्यावरील पार्ट्या आदी गैरप्रकारांवर प्रशासकीय यंत्रणेने नियंत्रण आणले होते. त्यातच ‘कोविड’ महामारीमुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून या बंधाऱ्यावरील गजबजाटावर कमालीचे नियंत्रण आले होते. आता हा बंधारा पुन्हा एकदा गजबजू लागला आहे. वेगवेगळ्या भागातून खास मोटारगाड्या घेऊन पर्यटक या बंधाऱ्यावर येत आहेत.

गैरप्रकारावर आले नियंत्रण

अनेकजण कुटुंबासह या बंधाऱ्यावर येताना दिसून येतात. साळच्या बाजूने गर्दी झाली की, काहीजण दुसऱ्याबाजूने असलेल्या बंधाऱ्यावर जाणे पसंत करतात. साळ बंधाऱ्यावरील गैरप्रकारावरही बरेच नियंत्रण आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. उष्णतेत झालेली कमालीची वाढ लक्षात घेता, पावसाळा सुरू होईपर्यंत या बंधाऱ्यावर पर्यटकांचा गजबजाट जाणवणार आहे.

Sal dam, goa
Bicholim News : मगरीने हिरावला तीन मुलांचा घास!

तरुणाई होते आकर्षित :

समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कळंगुट, बागा आदी किनारपट्टी भागातूनही पर्यटक या बंधाऱ्यावर येत आहेत. रविवारी (ता.२८) कळंगुट भागातून तरुणाईचा एक गट साळ बंधाऱ्यावर पर्यटनाची मजा लुटण्यासाठी आला होता. साळ बंधाऱ्यावर उन्हाळी पर्यटनाची मजा काही औरच आहे, असे या गटातील युवक-युवतींनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com