खुलेआम फिरणाऱ्या पर्यटकांना हेरून लुटमार

प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

जवळ जवळ चार महिन्यांचा कालावधी कोवीड महामारीच्या निमित्ताने राज्यात जवळपास चार महिने  लागुं करण्यात आलेल्या  लॉकडाऊनच्या धसक्यात घालवल्यानंतर गेल्या आठवड्यापासून बार्देशातील कळंगुट, बागा, हणजूण तसेच वागातोर समुद्र किनारे पुन्हां एकदां  पर्यटकांनी फुलू लागले आहेत.

शिवोली; जवळ जवळ चार महिन्यांचा कालावधी कोवीड महामारीच्या निमित्ताने राज्यात जवळपास चार महिने  लागुं करण्यात आलेल्या  लॉकडाऊनच्या धसक्यात घालवल्यानंतर गेल्या आठवड्यापासून बार्देशातील कळंगुट, बागा, हणजूण तसेच वागातोर समुद्र किनारे पुन्हां एकदां  पर्यटकांनी फुलू लागले आहेत.

दरम्यान, राज्यात खुलेआम फिरणाऱ्या पर्यटकांना हेरून त्यांना हॉटेलच्या खोल्या स्वस्त दरांत  देण्याचे आमिष दाखवीत त्यांना लुटण्याच्या  घटना घडल्याच्या तक्रारी  कळंगुट पोलिसांत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, अशा घटनांमुळे  पर्यटकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा विपरीत परिणाम आधीच कंबरडे मोडलेल्या पर्यटन व्यवसायांवर होण्याची भीती स्थानिक पंचायतीचे माजी उप-उपसरपंच तथा विद्यमान पंच सदस्य सुदेश मयेंकर यांनी व्यक्त केली आहे. तथापि, पर्यटक हंगामाच्या सुरुवातीलाच अशा घटना घडल्याने स्थानिक पोलिस दलाची संख्या वाढविण्याची  मागणी जोर धरत आहे.  दरम्यान, बेंगळुरु येथील गिरीश शेट्टी  व त्याचे अन्य तीन मित्र आपल्या कारगाडीतून कळंगुट परिसराचा फेरफटका मारीत असता  अचानक त्यांच्या मोटारगाडी समोर आलेल्या लालसाब आमिन नदाफ या परप्रांतीय तरुणाने त्यांची गाडी अडवीत त्यांना चांगल्या हॉटेलमधील सुसज्ज खोली तसेच इतर मनोरंजनाची साधने पुरविण्याचे आश्वासन दिले. यावेळी पर्यटक गिरीश शेट्टी व मित्रांनी संशयित दलाल लालसाब नदाफ यांच्या दुचाकीचा पाठलाग करीत पर्वरीतील  एका खाजगी हॉटेलात आणले.  दरम्यान, यावेळी अत्यंत बेसावध असलेल्या गिरीश शेट्टी त्याच्या अन्य तीन मित्रांवर पर्वरीतील त्या हॉटेलच्या खोलीत  प्रवेश केला असतां त्याजागेत आधीच दबा धरुन बसलेल्या लालसाब व त्याच्या मित्रांनी मनीष रौठान (उत्तर-प्रदेश) तसेच जयदीप दुहाल (हरियाणा ) यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला व त्यांना जबर जखमी केले. यावेळी लालसाबचा अन्य एक मित्र अंशुमन शर्मा (दिल्ली) याने  त्यांच्या खिशातील रोख रक्कम तसेच एटीएम मशीनचा वापर करून त्यांचे पैसे लाटल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.  या प्रकरणाची तक्रार पोलिसांत केल्यास भयंकर परिणामांना सामोरे जाण्याची भिती गिरीश शेट्टी व त्याच्या मित्रांना संशयित लालसाब तसेच मित्रांनी धमकी दिली. दरम्यान, झाल्या प्रकरणाने.गांगरून गेलेल्या गिरीश शेट्टी व त्याच्या मित्रांनी धाडस करीत या घटनेची कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली. कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ व त्यांच्या टीमने याबाबतीत तात्काळ पाऊले उचलतांना घटनेचा मागोवा घेत संशयित अंशुमन शर्मा , मनीष रोठाध तसेच जयदीप दोहाल यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले , सध्या तिघेही संशयित कळंगुट पोलीस स्थानकाची हवा खात आहेत.

दुर्दैवाने या प्रकरणातील मुख्य संशयित लालसाब नदाफ व अन्य एक जण पोलिसांना चकवा देत फरार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. जीवाचा गोवा करायला आलेल्या पर्यटकांना परप्रांतीय तरुणांनी पर्वरीत मारहाण करीत लुटले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत तिघांच्या मुसक्या आवळल्या. दोघे फरार झाले.  अशा घटनांमुळे व्यवसाय धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली गेली.

संबंधित बातम्या