गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी ; सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

कोरोनामुळे अनेक दिवस पर्यटन बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता, परंतु आता गोव्यातील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे पुन्हा सुरू झाल्याने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी होऊ लागली आहे.

पणजी :  कोरोनामुळे अनेक दिवस पर्यटन बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता, परंतु आता गोव्यातील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे पुन्हा सुरू झाल्याने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी होऊ लागली आहे. या आठवड्यात विकेन्डची संधी साधून विविध राज्यांमधील अनेक पर्यटक गोव्यात दाखल झाले आणि शनिवारी बीचवर एन्जॉय करताना दिसले. परंतु, बहुतांश पर्यटकांनी फेस मास्क न लावल्याने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने स्थानिकांच्या सुरक्षिततेविषयी शंका निर्माण झाली. 

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, गोव्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होत असले, तरी पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये, याकरिता काळजी घेणे गरजेचे आहे.

अधिक वाचा : 

गोव्यातही राष्ट्रवादीचे समर्थक

गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांची ईओसीकडून चौकशी

विद्यार्थांमधील कलागुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करा: प्रवीण आर्लेकर

संबंधित बातम्या