गोव्यात रात्रभर नववर्षाचा जल्लोष ; सध्या गोव्यात ४०-४५ लाख पर्यटक

Tourists rushes to Goa to celebrate Christmas and new year even amidst the corona pandemic
Tourists rushes to Goa to celebrate Christmas and new year even amidst the corona pandemic

पणजी : काल मध्यरात्रीपासून सुरू झालेला नव वर्ष स्वागताचा जल्लोष आज पहाटेपर्यंत चालल्याने गोव्यात अनेकांची सकाळ आज उशिरा उगवली. काल रात्रभर विशेषत: किनारी भागात झिंग आणणारे संगीत, त्याच्या तालावरील पदन्यास, रिते होत जाणारे चषक याच्या सोबतीने नव वर्षाचे लाखो पर्यटकांनी स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी बऱ्यापैकी करण्यात आली होती. 

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या म्हणण्यानुसार ४०-४५ लाख पर्यटक गोव्यात सध्या आलेले आहेत. काल मध्यरात्री मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत चर्चमध्ये प्रार्थनासभा झाल्या. कोरोनाचे सावट असतानाही नववर्ष स्वागतावर  त्याची छाया नव्हती, जणू नववर्षात  कोविडचे अस्तित्व जणू संपले आहे अशा उधाणत्या उत्साहात नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. यासाठी किनारी भागात मेजवान्यांच्या आयोजन करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com