कार्निव्हल,'व्हॅलेंटाईन विक'मध्ये गोव्याकडे वळली पर्यटकांची पावले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

कोरोनाच्या प्रभावामुळे इतके दिवस गोव्याचा पर्यचन व्यवसाय मंदीत होता. थर्टी फर्स्टमुळे गोव्यातील पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसून आली.

पणजी : कोरोनाच्या प्रभावामुळे इतके दिवस गोव्याचा पर्यचन व्यवसाय मंदीत होता. थर्टी फर्स्टमुळे गोव्यातील पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसून आली. आता या अठवड्यातदेखील व्हॅलेंटाईन विकमुळे गोव्यात पर्यटकांचे उधाण येण्याची शक्याता आहे. गोव्यातील हॉटेल-रेस्टॉरंट्सचे बुकिंग हाऊसफुल झाले असून, व्हॅलेंटाईन विक आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या गोवा कार्निव्हलमुळे गोव्याच्या पर्यटनाला पुन्हा अच्छे दिन येणार आहेत. राज्यात डिसंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये चांगला व्यावसाय झाल्याचं पर्यटन व्यावसायिकांनी सांगितलं आहे. 

या विकेन्डला गोव्याला जाताय? जाणून घ्या विमानांचे वधारलेले दर

गोव्याची विमानसेवा पूर्ववत होत असल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्याता आहे. गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडशी (जीईएल) संलग्नित असलेल्या 3,497 हॉटेल्सपैकी  1,270 हॉटेल्स सुरू झाले आहेत. विकेन्डला पर्यटकांची गर्दी वाढत असली, तरी आठवड्यातील संख्याही बऱ्यापैकी आहे. आठवड्याच्या दिवसात आमच्याकडे देशांतर्गत पर्यटक येतात, पण त्यांच्यामुळे जास्त नफा होत नसल्याचं उत्तर गोव्यातील हॉटेलवाल्यांनी सांगितलं.

नौदलाने वाचविला पणजी पुलावरून पडलेल्या त्या महिलेचा जीव

उत्तर गोव्याच्या कॅलंगुट आणि बागा किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.याव्यतिरिक्त, शांत व निवांत सुट्टीच्या शोधत असलेले प्रवासी असगावमधील व्हिलामध्ये राहणे पसंत करतात. असगाओ हे नेहमीच्या रेट्या व गर्दीपासून दूर सुट्टी घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण आहे. तर, स्थानिक पर्यटक हे अरम्बोळला पसंती देताना दिसतात. 
 

संबंधित बातम्या