मडगाव मार्केटमधील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर

वार्ताहर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

मडगावातील न्यु मार्केट व गांधी मार्केटमधील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असून ग्राहक स्वतःहून सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन करीत आहेत गेले सहा महिने व्यापाऱ्यांची विस्कळीत झालेली आर्थिक घडी आता सावरू लागली आहे.

नावेली: मडगावातील न्यु मार्केट व गांधी मार्केटमधील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असून ग्राहक स्वतःहून सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन करीत आहेत गेले सहा महिने व्यापाऱ्यांची विस्कळीत झालेली आर्थिक घडी आता सावरू लागली आहे.

मडगाव न्यु मार्केट टेडर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी गेले पाच ते सहा महिने मार्केट मध्ये कोरोनाच्या भिती मुळे ग्राहक येत नसल्याने व्यवसाय मंदावला होता मात्र,आता ग्राहक येत असून व्यवसाय होऊ लागला असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.

सध्या कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा मडगावात दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे लोक स्वतःची काळजी कशी घ्यावी या संदर्भात सतर्क आहेत.
मार्केट मध्ये येणाऱ्या ग्राहकांची मार्केटच्या  प्रवेश व्दारावर थर्मलगनचा वापर करून तपासणी केली जाते असे शिरोडकर यांनी सांगितले.पिंपळकट्टा परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भिकारी वर्गातील लोक मास्कचा वापर न करता सर्रासपणे फिरताना दिसतात यासाठी मार्केट मध्ये तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी त्यांना तेथून दुसरीकडे स्थलांतरित करावेत अशी मागणी शिरोडकर यांनी केली आहे.

मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देविदास बोरकर यांनी मार्केट मधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पूर्णपणे सुरू केली असून आता ग्राहकांना आवश्यक वस्तू मिळू लागल्याने हळूहळू स्थिती सुधारत आहे.ग्राहक स्वतः सामाजिक सुरक्षित अंतर पाळून खरेदी करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी 
सांगितले.

राजन आजगावकर यांनीही न्यु मार्केट तसेच गांधी मार्केट मध्ये ग्राहक येत असल्याचे सांगून ग्राहकांनी सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन तसेच मास्क चा वापर करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

सुनिल विर्डिकर यांनीही सध्या मार्केट मध्ये ग्राहक येत असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.

संबंधित बातम्या