मयेतील वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक ‘नवे’ उत्सव

ग्रामदैवत श्री महामाया देवी चरणी भाताचे कणीस अर्पण
मयेतील वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक ‘नवे’ उत्सव
महामाया मंदिरात भाताच्या कणसाची विधीवत पूजा करतानाDainik Gomantak

मये: शेकडो वर्षांची परंपरा आणि तीन गावांशी संबंध जोडलेला डिचोलीतील मये गावातील वैशिष्ट्यपूर्ण ‘नवे’ उत्सव रविवारी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेप्रमाणे ग्रामदैवत श्री महामाया देवीच्या चरणी भाताचे पहिले कणीस अर्पण करून नवे करण्यात आले.

महामाया मंदिरात भाताच्या कणसाची विधीवत पूजा करताना
पावाची विक्री पाच रुपयानेच!

शनिवारी पडलेल्या पावसाने आज (रविवारी) उघडीप केल्याने नवे उत्सव सुरळीतपणे साजरा करता आला. यंदा चिमुलवाडा येथील भानुदास साळगावकर यांच्या शेतीत नवे करण्यात आले. भातशेती पिकून कापणीसाठी तयार झाल्यानंतर परंपरेनुसार ‘नवे’ करण्याची प्रथा डिचोलीतील बहुतेक गावात प्रचलीत आहे. मये गावातही ही प्रथा पूर्वापारपासून चालत आली आहे. नवे उत्सव साजरा झाल्याने मये गावात आता भात कापणीच्या कामाला चालना मिळणार आहे. मयेतील नवे उत्सव मयेसह वायंगिणी आणि डिचोली गावाशी जोडलेला आहे.

महामाया मंदिरात भाताच्या कणसाची विधीवत पूजा करताना
गोवेकरांसाठी साई बाबांचे दर्शन झाले सोपे, कदंबची बससेवा सुरू

नवे उत्सवाच्या दिवशी मयेतील चौगुले, वायंगिणी येथील श्री खेतोबा देवस्थानचे चौगुले आणि डिचोलीतील श्री शांतादुर्गा देवस्थानचे ग्रामस्थ गावकर मानकरी मयेतील श्री महामाया देवीच्या प्रांगणात जमतात. नंतर वाजतगाजत सर्वजण शेतीत जातात. त्याठिकाणी नव्यासाठी कापायच्या भाताची निवड करतात. त्याठिकाणी विडा ठेवून भाताची विधीवत पूजा करुन घाडीतर्फे गाऱ्हाणे घातल्यानंतर भाताची कणसे कापण्यात येतात. नंतर चौगुले आणि ग्रामस्थ गावकर भाताची कणसे माथ्यावर घेवून वाजतगाजत श्री महामाया मंदिराकडे येतात. सर्व कणीसे देवीसमोर ठेवून त्यांची विधीवत पूजा करण्यात येते. नंतर उपस्थित प्रत्येकजण ही कणसे घेवून आपापल्या घरी येतात. कणसे आपापल्या घराच्या प्रवेशव्दारावर बांधतात. भाताच्या दाण्यांची खिचडी करून ती देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे. वायंगिणी येथील चौगुले श्री खेतोबा मंदिरात तर डिचोली येथील ग्रामस्थ गावकर श्री शांतादुर्गा मंदिरात भाताची कणसे आणून त्याठिकाणी विधीवत पूजा केल्यानंतर ग्रामस्थांना वाटतात. मये गावातील नवे उत्सवाची शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही टिकून आहे.

Related Stories

No stories found.