Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak

Chorla Ghat Blocked: चोर्ला घाटातील वाहतूक ठप्प; अवजड ट्रकमुळे कोंडी

बेळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनमोड घाटातून जाण्याचा पर्याय

Chorla Ghat Blocked: चोर्ला घाटात वारंवार वाहतुक कोंडीचे प्रकार समोर येत आहेत. रविवारीही एका अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे घाटात कोंडी झाली. या ट्रकमुळे रस्ताच ब्लॉक झाला असून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे बेळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनमोड घाटातून जाणे सोयीस्कर ठरणार आहे.

Chorla Ghat
Marigold In Sattari: सत्तरी तालुका ‘झेंडूमय’; दिवाळीत 1 टन फुलांची विक्री

काही दिवसांपुर्वीच रात्री 10 नंतर एक वाहन खराब झाल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. पहाटे ही वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. या आधी चोर्ला घाटात सप्टेंबर महिन्यात अवजड वाहनांसाठी बंद घालण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आणि दोन दिवसात बाहेरील वाहनचालकांनी घाटावरच गाड्या अडविणार, भाजी, दुधाची वाहतूकही बंद करणार असा इशारा देताच रात्री 10 ते सकाळी सहापर्यंत या वाहनांना सूट दिली होती.

चोर्लातून 24 तास अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, पण कुठेही सीमेवर ‘त्या’ आदेशाची नोटीस लावलेली नाही. त्यामुळे अवजड वाहने दिवसभर घाट रस्‍त्यावरून केरीपर्यंत येतात.

Chorla Ghat
Goa Mid-Day Meal: एका विद्यार्थ्यावर सरकार 20 रुपये खर्च करु शकत नाही, हे लज्जास्पद!

दरम्यान, बेळगावहून गोव्यात येणारी वाहने परतवून लावणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण गोवा राज्याच्या घाट रस्त्‍यावर वाहने वळवण्यासाठी पुरेशी जागा नाही. मात्र, ही वाहने सुर्ला येथे कर्नाटक तपासणी नाक्यावर रोखणे शक्य असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

बेळगावहून येणाऱ्या अवजड वाहन चालकांना गोवा सीमेपर्यंत कुठेही अडवले जात नाही. त्यामुळे ही वाहने थेट घाट रस्त्‍यांने गोव्यात प्रवेश करतात. घाटात त्यांना बंदीबाबत सूचना केल्यानंतर ही वाहने घाटातच रात्री दहा वाजेपर्यंत थांबवली जातात. अरुंद रस्त्यामुळे घाटात अनेक वेळा वाहतूक कोंडी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com