Goa Traffic: पणजी- पर्वरी महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी

वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी होतेय मागणी
Goa Traffic
Goa TrafficDainik Gomantak

गोवेकरांना नेहमीची भेडसावणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. मडगाव, पर्वरी सारख्या शहरी भागात तर वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच बनला आहे. आज दुपारच्या सत्रात पणजी पर्वरी महामार्गावर गोवेकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या मार्गावर साधारणतः दुपारी 2 वाजल्यापासून वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या.

त्यामुळे या मार्गावर आणि एकूणच शहरातील वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे. आज विकेंड असून सकाळ पासूनच पर्वरी- पणजी मार्गावर वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या. तसेच या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेला विशेषतः सायंकाळी 5 ते 7 दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होते.

Goa Traffic
Goa Tourism: पर्यटन करा मात्र उघड्यावर स्वयंपाक नको...नाहितर भरावा लागेल इतका दंड

पणजीहून कामावरून थकून-भागून पर्वरी, म्हापसा, पेडणेकडे जाणाऱ्या नोकरदार, प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून वाहतूक पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच म्हापसा शिवोली मार्गावर सुद्धा नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यावेळी अक्षरशः आपत्कालीन सेवांनाही खीळ बसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com