पावसामुळे पणजीत वाहतूक कोंडी

पहाटेपासून सुरू झालेल्‍या जोरदार पावसामुळे कदंब बसस्‍थानक परिसरातील दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
पावसामुळे पणजीत वाहतूक कोंडी
Traffic jam in Panaji due to rainsDainik Gomantak

Goa Rain Update : मुसळधार पावसामुळे राजधानी पणजीतील जनजीवन आज शनिवारी विस्‍कळीत झाले. पहाटेपासून सुरू झालेल्‍या जोरदार पावसामुळे कदंब बसस्‍थानक परिसरातील दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे ग्राहक येत नसल्‍याने येथील दुकानदारांनी नाराजी व्‍यक्‍त केली.

Traffic jam in Panaji due to rains
धुलई धारबांदोडा येथे गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

गटारे स्‍वच्‍छ केली नसल्‍याने पाणी तुंबल्‍याचे दुकानदारांनी सांगितले. सायंकाळी चारच्‍या सुमारास पणजीत येणाऱ्या सर्व मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच मांडवीवरील जुन्‍या दोन्‍ही पुलांवर वाहनांची मोठी रांग लागली होती. दुसरा शनिवार असल्‍याने शासकीय सुट्टी असूनही शहरात लोकांची आणि वाहनांची गर्दी दिसून आली.

पणजी महानगरपालिकेने मान्‍सूनपूर्व कामे वेळेत झाल्‍याचे सांगितले होते. तरीही शहरातील काही रस्‍त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. पहिल्‍याच पावसात तारांबळ उडाल्‍याने लोकांनी नाराजी व्‍यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com