डिचोलीत बेशिस्त पार्किंगमुळे बाजारातील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

Traffic jam on market streets due to unruly parking in bicholi
Traffic jam on market streets due to unruly parking in bicholi

डिचोली - डिचोली शहरात वाहतूक कोंडीचे प्रकार नेहमीचेच बनले आहे. सध्या पावसामुळे हे प्रकार वाढत आहेत. आज दुपारी कदंब बसस्थानकाकडून बाजाराच्या दिशेने गेलेल्या रस्त्यावर बराच वेळ 'चक्का जाम' झाला होता. (Traffic jam on market streets due to unruly parking in bicholi)


नवीन बसस्थानक ते जुन्या बसस्थानकापर्यंत दोन्ही बाजूने वाहने अडकून पडली होती. बाजार परिसरात या रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे उभी करून ठेवण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली होती. डिचोली शहरातील सोनारपेठ, पाजवाडा आदी काही ठराविक भागात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार नेहमीचेच बनले आहेत. 

कदंब बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानापर्यंतच्या रस्त्यावर हे प्रकार वाढत असतात. साप्ताहिक बाजाराच्या दिवशी तर या रस्त्यावर हटकून वाहतूक कोंडी होत असते. बाजारातील दुकानदारांना माल पुरवठा करणारी वाहने या रस्त्यावर उभी करण्यात येतात. त्यातच काहीजण आपली वाहने मिळेल तशी बेशिस्तपणे उभी करून 
ठेवतात.

त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार वाढत असल्याचे आढळून येत आहे. दोन  महिन्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी बेशिस्त पार्किंग विरोधात मोहीम हातात घेतली होती. तेव्हा अशा वाहनांच्या टायरांना 'लॉक' लावण्यात येत होते. सध्या ही मोहीम थंडावल्याने बेशिस्त पार्किंग समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com