Sal festival: साळ गडेत्सवसाठी वाहतूक, पार्किंग नियोजन

उद्यापासून उत्सव ः विविध संस्था,क्लबची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात; विविध ठिकाणी वाहनतळ सुविधा
Sal
SalDainik Gomantak

साळ मधील प्रसिद्ध गडेत्सव मंगळवार दि. 7 ते गुरुवार दि. 9 मार्चपर्यंत तीन रात्री हा उत्सव साजरा होणार असून श्री महादेव भूमिका देवस्थान समिती, गडे मंडळ , साळ ग्रामपंचायत आणि साळ मधील विविध संस्था व क्लबनी सर्व तयारी पूर्ण केली असून मंदिर पदाधिकारी तसेच महाजन नियोजनाच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. गडेत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या बैठकीत वाहनतळ निश्‍चिती तसेच वाहतुकीच्या नियोजनासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली.

बैठकीस श्री महादेव भूमिका देवस्थान समिती अध्यक्ष कालिदास राऊत , सचिव विशाल परब , समाज सेवक व महाजन मेघश्याम राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते. मंगळवारी या उत्सवाला सुरुवात होणार असून प्रत्येक रात्री येणाऱ्या भाविकांची वाहने साळ मध्ये दाखल होतात.

येणाऱ्या भाविकांना व नंतर गडा आणण्यासाठी धावणाऱ्या भाविकांना कोणताही अडथळा होऊ नये, म्हणून येणाऱ्या वाहनधारकांनी आपापली वाहने कोण - कोणत्या वाहनतळावर उभी करावीत, त्यावर चर्चा करण्यात आली.

खास पोलिस चौकी उभारली जाईल तसेच गस्तीवर पोलिस असणार आहेत दररोज संध्याकाळी 4 वा. पोलिस गावात प्रवेश करतील.वीज कर्मचारी रात्रीही तैनात राहणार आहेत. तिरसोळी येथे ओहोळावर तात्पुरता पूल बांधण्याचे काम पूर्ण होत आहे.

तसेच बाबरेश्वर येथे मशाल बघण्यासाठी धावताना विठ्ठल नाईक यांच्या घरासमोरील विभागात साफसफाई केली आहे. तसेच गड्यांना करयेश्वर येथे करये आणायला जाताना जो खडतर मार्ग आहे, त्याचीही दुरुस्ती केली आहे, असेही देवस्थान समितीने सांगितले.

Sal
Water Dispute : साळ गावावर तीव्र पाणीटंचाईचे संकट

धुमासेमार्गे येणाऱ्यांना 10 नंतर मार्ग बंद

श्री सातेरी पुरूमार मंदिराजवळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होईल, त्यामुळे धुमासे मार्गे येणाऱ्या भाविकांनी रात्री 10 नंतर साळमध्ये प्रवेश करू नये. कासारपाल मार्गे येणाऱ्या वाहनधारकांना रात्री 11 नंतर प्रवेश बंद असेल. फक्त दोडामार्ग खोलपेमार्गे येता येईल, पण तिन्ही मार्ग पहाटे 5 नंतरच खुले केले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com