डिचोलीत वाहतूक पोलिस विभाग सक्रिय

डिचोलीत वाहतूक पोलिस सक्रिय; मद्यपींसह बेधुंद वाहनचालकांविरोधात कारवाई
Goa Police
Goa Police Dainik Gomantak

डिचोली: भीषण अपघातसत्रानंतर डिचोलीतही वाहतूक पोलिस विभाग गेल्या तीन-चार दिवसांपासून अधिक सक्रिय झाला आहे. मद्यपी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालका विरोधात वाहतूक पोलिसांतर्फे कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतूक पोलिस विभागाचे निरीक्षक गौरीश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आणि एएसआय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिस विभागाच्या कार्यक्षेत्रात ही मोहीम चालू आहे.

(Traffic police department active in bicholim)

Goa Police
Goa Accident Case अपघात पाहणीसाठी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघात!

बुधवारी मद्यरात्रीपर्यंत दोन रात्री अस्नोडा पार पुलाजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन मद्यपी वाहनचालक आढळून आले. त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली-अस्नोडा मार्गावरील व्हाळशी येथील आयटीआय परिसर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण आणण्यासाठी त्याठिकाणी कॅमेरा बसवून वाहनांची वेगमर्यादा तपासण्यात येत आहे. वेगमर्यादा आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना 'तालाव' देण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com