राज्यातील १८ जून रोडवर १७ पोलिसांची नजर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

पणजी शहरातील सतत वाहन वर्दळीचा मार्ग असलेल्या १८ मार्गावर चौकाचौकांतून वाहतूक पोलीस नजरसे पडत आहेत. विना हेल्मेट आणि रस्त्याच्या बाजूला चारचाकी वाहने उभ्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम सध्या या पोलिसांकडून केले जात आहे. 

 पणजी : पणजी शहरातील सतत वाहन वर्दळीचा मार्ग असलेल्या १८ मार्गावर चौकाचौकांतून वाहतूक पोलीस नजरसे पडत आहेत. विना हेल्मेट आणि रस्त्याच्या बाजूला चारचाकी वाहने उभ्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम सध्या या पोलिसांकडून केले जात आहे. 

वाहतूक पोलिसांना अमूक असे टार्गेट दिले जाते, असे म्हटले जाते. आता ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी कारवाईद्वारे शुल्क आकारणी होणे गरजेचे असते. वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीरपणे तालाव देऊन ते टार्गेट पूर्ण करण्याकडे पोलिसांचा सध्या कल वाढल्याचे दिसून येते.

शहरात अनेक लोक विना हेल्मटचे दुचाकीवरून वाहने चालवित असतात, त्याशिवाय चारचाकी वाहनचालक सिटबेल्ट लावत नसलेले, चुकीच्या ठिकाणी वाहन उभे केल्याने त्यांच्यावर हे पोलिस सध्या कारवाई करताना दिसत आहेत. 
मेरशी चौकात पुलाखाली आठ ते दहा वाहतूक पोलिसांचा जमाव दिसून येतो. वाहतूक नियंत्रित करण्यापेक्षा परराज्यातील वाहने आणि विना हेल्मेट किंवा सिटबेल्ट न लावलेल्यांना अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम येथे जोरदारपणे सुरू असते.

संबंधित बातम्या