ट्राफिक सेंटनेल योजना ‘सलाईन’वर 

traffic sentinel
traffic sentinel

पणजी

 गोवा पोलिस खात्याने सुरू केलेली ‘ट्राफिक सेंटीनेल’ योजना सुरू असली तरी त्यात सहभागी होऊन नोंद असलेल्या सदस्यांना गेल्या काही महिन्यांपासून मिळणारे बक्षीसवजा मानधनच मिळाले नसल्याने आदित्य कटारिया याने गोवा मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही योजना बारगळली आहे. 
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची छायाचित्रे पाठवून मानधन कमावण्याची योजना गोव्याचे माजी पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी सरकारच्या मदतीने सुरू केली होती. या योजनेमध्ये सुमारे ५ हजाराहून अधिक सदस्य नोंदणी झाले आहेत. सुरुवातीच्या काळात ट्राफिक सेंटीनेल सदस्यांना चांगल्यापैकी मानधन मिळत होते. दुचाकी चालकांनी हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न वापरणे, दुचाकीवर तीन स्वार होणे अशा सुमारे दहा विविध नियमांसाठी गुण निश्‍चित करण्यात आले होते. या विविध नियमांच्या उल्लंघनातून ट्राफिक सेंटीनेलचे १०० गुण जमा झाल्यावर त्याला एक हजार रुपये मानधन दिले जात होते. या योजनेकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग तसेच बेरोजगार असलेले तरुण आकर्षित झाले होते. त्यामध्ये काही महिला व तरुणींचाही समावेश होता. काहींनी सुरुवातीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांची छायाचित्रे मोबाईलवर काढून वाहतूक खात्याला पाठविली होती. त्यासाठी या ट्राफिक सेंटीनेलला चांगली रक्कमही मिळत होती. मात्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक व्यवस्था कोलडमडल्याने ट्राफिक सेंटनेलचे झालेल्या गुणांची माहितीही वाहतूक पोलिस खात्याने देणे बंद केले आहे. 
दुचाकी चालक हेल्मेट घालत नसल्याने व वाहतूक पोलिस त्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्याने माजी पोलिस महासंचालकांनी ही योजना सुरू केली होती. या योजनेमुळे अनेक ट्राफिक सेंटनेलनी सदस्य म्हणून नोंदणी केली व हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांची छायाचित्रे काढून पाठविण्यास सुरुवात केल्यावर राज्यात दुचाकीचालक हेल्मेट वापरण्यास लागले. त्यामुळे जे पोलिसांना जमले नाही ते या ट्राफिक सेंटीनेलनी केले. या कामासाठी वाहतूक पोलिस खात्याकडून बक्षीसवजा मानधन दिले जात होते. ट्राफिक सेंटीनेलनी नियम उल्लंघन केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठविली आहेत मात्र त्याची माहिती सेंटीनेलचे १०० गुण झाल्यानंतर दिली जात नाही. ट्राफिक सेंटीनेल केलेल्या या कामासाठी जाहीर केल्यानुसार बक्षीसवजा मानधन देणे क्रमप्राप्त आहे. ही रक्कम त्यांना मिळावी व तो त्यांचा अधिकारच आहे. या ट्राफिक सेंटीनेलमुळेच गोव्यात आजच्या मितीस सुमारे ८० टक्के दुचाकी चालक हेल्मेट घालत आहेत. या योजनेमुळे हेल्मेट खरेदीमध्ये वाढ झाली. आज गोव्यात दुचाकी चालक हेल्मेट घालत आहेत हे ट्राफिक सेंटीनेलने केल्लाय प्रयत्नामुळे आहे, असे आयोगाला दिलेल्या पत्रात कटारिया यांनी म्हटले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com