वास्कोतील सिग्नल यंत्रणा बनली ‘शोभेची वस्तू’

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

बेसुमार वाहन संख्या वेढलेल्या वास्को शहरात आश्वासक अशी वाहतूक सिग्नल यंत्रणा दिसून येत नाही. २० वर्षांपूर्वी सेंट एन्ड्रूज चर्च जवळ बसविलेले सिग्नल सद्यःस्थितीत शोभेची वस्तू बनली आहे.

मुरगाव: बेसुमार वाहन संख्या वेढलेल्या वास्को शहरात आश्वासक अशी वाहतूक सिग्नल यंत्रणा दिसून येत नाही. २० वर्षांपूर्वी सेंट एन्ड्रूज चर्च जवळ बसविलेले सिग्नल सद्यःस्थितीत शोभेची वस्तू बनली आहे.

वास्को शहरात प्रवेश करण्यासाठी सेंट एन्ड्रूज चर्च समोरील हुतात्मा चौकात वाहनांची सदैव गर्दी असते. त्यामुळे या चौकात वाहनांची कोंडी होऊन सुरळीत वाहतुकीला आडकाठी येते. त्यामुळे या चौक परिसरात एका कोपऱ्यात विजेवरील वाहतूक सिग्नल २० वर्षांपूर्वी बसविले होते. एक दोन महिने हे सिग्नल चालल्यानंतर बंद झाले ते आजपावेतो कार्यन्वित करण्यात आले नाहीत. या सिग्नलचे अवशेष गंजलेल्या अवस्थेत मात्र वास्कोत दृष्टीस पडते.

वास्को शहरात वाहतूक सिग्नल नसले तरी दाबोळी विमानतळ जंक्शन, एमईएस कॉलेज जंक्शन, वारीस गॅरेज जंक्शन आणि वेर्णा येथे मडगाव-कुठ्ठाळी मार्गावर स्वयंचलित वाहतूक सिग्नल आहेत. तथापि, दाबोळी विमानतळावर असलेले सिग्नल गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत.

संबंधित बातम्या