गंगाराम मोरजकर यांचे दु: खद निधन

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या ग्राहक व्यवहार समितीचे अध्यक्ष गंगाराम (भाई) मोरजकर (Gangaram Morjakar) यांचे बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता निधन झाले.
Gangaram Morjakar
Gangaram MorjakarDainik Gomantak

पणजी: विविध सामाजिक संस्थांवर पाच दशकांहून जास्त काळ कार्य केलेले व गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या ग्राहक व्यवहार समितीचे अध्यक्ष गंगाराम (भाई) मोरजकर (Gangaram Morjakar) यांचे बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता निधन झाले. पाय घसरून पडल्यापासून ते गेले काही दिवस आजारी होते.आजार बाळावल्याने त्यांना गोवा वैद्यकीय इस्पितळात त्यांना आठ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते.

Gangaram Morjakar
शिवोलीतील अपार्टमेंटमध्ये मुंबई स्थित तरुणाचा झोपेतच मृत्यू

त्यांच्या मागे तीन विवाहित पुत्र,तीन विवाहित कन्या, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1933 साली मयडे-बार्देस येथे मागास वर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी लायन्स क्लब पणजी,अखिल गोमंतक चर्मकार समाज या संस्थांचे अध्यक्षपद भूषविले होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोवा शाखा, गोवा कॅन्सर सोसायटी, साहित्य सेवक मंडळ, कोंकण रेल्वे व दक्षिण पश्चिम रेल्वे समिती ,पणजीकर सार्वजनिक गणेशोत्सव, सुरईश सांस्कृतिक संस्था, आशा महल संस्था, संचालक मंडळ गोवा राज्य सहकारी बँक,गट सल्लागार समिती बार्देस तालुका अशा अनेक संस्थावर सक्रीय कार्य केले होते. दलित व इतर मागासवर्गीय लोकांसाठी केलेल्या कार्याबद्दल गोवा मुक्तिदिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. सार्वजनिक कामात त्यांनी अगदी अलिकडे पर्यंत उत्साहाने भाग घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com