सणानिमित्त मडगाव-मुंबई मार्गावर धावणाार रेल्वे गाड्या

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

सणांच्या निमित्ताने मडगाव ते मुंबई या मार्गावर जादा गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या जागी या गाड्या चालवल्या जाणार आहेत. पूर्णतः आरक्षित पद्धतीच्या या गाड्या कोविड महामारीच्या काळात आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेले निकष पाळून चालवल्या जाणार आहेत.

पणजी :  सणांच्या निमित्ताने मडगाव ते मुंबई या मार्गावर जादा गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या जागी या गाड्या चालवल्या जाणार आहेत. पूर्णतः आरक्षित पद्धतीच्या या गाड्या कोविड महामारीच्या काळात आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेले निकष पाळून चालवल्या जाणार आहेत.

मुंबई (सीएसटी) ते मडगाव ही ०११२ क्रमाकांची गाडी १ नोव्हेंबर ते १४ जानेवारीपर्यंत दररोज धावणार आहे. मडगावहून सायंकाळी सहा वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता ती गाडी मुंबईला पोचणार आहे. ०१११ क्रमांकाची गाडी मुंबईहून रात्री ११.०५ वाजता निघून सकाळी १०.४५ वाजता मडगावला पोचणार आहे. २ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या काळात ही गाडी धावेल.

या गाडीला राज्यात करमळी, थिवी, पेडणे येथे थांबे आहेत. २२ डब्यांच्या या गाडीला शयन श्रेणीचे ९ तर द्वितीय श्रेणीचे ४ डबे असतील. मडगावहून मुंबईला जाण्यासाठी ०१११४ क्रमांकाची गाडी सकाळी ९.१५ वाजता निघून मुंबईला रात्री ९.४० वाजता पोचणार आहे. २ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या काळात ही गाडी धावेल. ०१११३ क्रमांकाची गाडी मुंबईहून सकाळी ७.१० वाजता निघून सायंकाळी सात वाजता मडगावला पोचेल. २ नोव्हेंबर ते १५ जानेवारी  या काळात धावणाऱ्या या गाडीला करमळी थिवी व पेडणे येथे थांबा आहे. २२ डब्यांच्या या गाडीला शयन श्रेणीचे ९ तर द्वितीय श्रेणीचे ४ डबे असतील. येत्या शनिवारी (ता. ३१) या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या