Goa Police : राज्यातील 50 पोलीस उपनिरीक्षकांसह 111 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक सुनीता सावंत यांनी जारी केले आदेश
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police : गोवा पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे तीन वेगवेगळे आदेश काल जारी करण्यात आले आहेत.

या जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये 50 पोलीस उपनिरीक्षकांसह 111 कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश आहेत. पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक सुनीता सावंत यांनी आदेश जारी केले आहे.   

Goa Police
Vasco : वास्कोत 'या' भागात 3 दिवस विजेचा पुरवठा असणार बंद; वाचा सविस्तर

आदेशानुसार, पोलीस खात्यातील 50 उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यात 9 महिला पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहेत. याशिवाय 37 सहाय्यक उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

यात 8 महिला सहाय्यक उपनिरीक्षकांचा समावेश आहेत. याशिवाय 24 इतर पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यात 1 सहाय्यक उपनिरीक्षक (वायरलेस ऑपरेटर), 4 हवालदार (आरटीओ), 2 हवालदार (चालक) आणि 17 पोलीस चालकांचा समावेश आहे.       

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com