Goa Police : राज्यातील 22 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पेडणे, कळंगुट, वेर्णा, फोंडा, डिचोली पोलिस निरीक्षकांना साईड पोस्‍टिंग देण्यात आली आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या 22 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी काढण्यात आला. म्हापसा वाहतूक पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांची फोंडा पोलिस स्थानकात तर कळंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांची पणजी सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.

या बदल्यांचा आदेश दोन महिन्यांपूर्वीच काढण्यात येणार होता, मात्र काहींच्या बदल्या मंत्री व आमदारांच्या मर्जीनुसार नसल्याने त्या स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. पेडणे, कळंगुट, वेर्णा, फोंडा, डिचोली पोलिस निरीक्षकांना साईड पोस्‍टिंग देण्यात आली आहे.

Goa Police
Goa News : 18 मेगा प्रकल्पांना ‘आरजी’चा आक्षेप

फोंड्याचे दोन क्रमांकाचे पोलिस निरीक्षक सजिथ पिल्ले यांची अमलीपदार्थविरोधी कक्षात तर या कक्षातील निरीक्षक अरुण देसाई यांची केपे पोलिस स्थानकात बदली करण्यात आली आहे.

केपेचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांची बेतूल किनारपट्टी सुरक्षा पोलिस स्थानकात, फोंड्याचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांची पणजी सुरक्षा विभागात तर या विभागातील मर्लोन डिसोझा यांची म्हापसा वाहतूक पोलिस स्थानकात, निरीक्षक मेल्सन कुलासो यांची वेर्णा पोलिस स्थानकात तर तेथील निरीक्षक डायगो ग्रासिएस यांची पणजी मुख्यालयात बदली करण्‍यात आली आहे.

Goa Police
Gas Connection : फोंड्यात 'गॅस कनेक्शन’ चा मोठा गाजावाजा पण ; नागरिकांना मिळणार कधी?

कुडचडे विशेष शाखेचे निरीक्षक विकास देयकर यांची क्राईम ब्रँचमध्ये, कोकण रेल्वे निरीक्षक सचिन पनाळकर यांची कुडचडे विशेष शाखेत, निरीक्षक सुनील गुडलर यांची कोकण रेल्वेत निरीक्षक, महिला निरीक्षक अनुष्का पै बीर यांची क्राईम ब्रँचमध्ये, म्हापशाचे निरीक्षक परेश नाईक यांची कळंगुट पोलिसस्थानकात, सचिन लोकरे यांची पेडणे पोलिसस्थानकात, निरीक्षक सीताकांत नाईक यांची म्हापसा पोलिसस्थानकात, निरीक्षक किशोर रामनन यांची क्राईम ब्रँचमध्ये, निरीक्षक सेरीफ जॅकीस यांची गोवा राखीव पोलिस दलात, सायबर गुन्हे कक्ष निरीक्षक रिमा नाईक यांची महिला पोलिस स्थानकात, निरीक्षक राहुल नाईक यांची डिचोली पोलिस स्थानकात तर पेडण्याचे दत्ताराम राऊत यांची क्राईम ब्रँचमध्ये बदली करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com