गोव्यातील 23 अधिकाऱ्यांच्या बदल्या

आठ अधिकाऱ्यांकडे इतर पदांचा अतिरिक्त ताबा
Transfers of 23 officers from Goa
Transfers of 23 officers from GoaDainik Gomantak

पणजी: गोवा (Goa) नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणीच्या 23 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा, तर आठ अधिकाऱ्यांना अतिरिक्त ताबा देण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यात उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. तिसवाडी उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांची बार्देश येथे, तर पेडण्याचे उपजिल्हाधिकारी रवीशेखर निपाणीकर यांची सहकारी संस्थांचे उपनिबंधक म्हणून बदली झाली आहे.

Transfers of 23 officers from Goa
Goa: गोमेकॉ बाहेर फळविक्रेते व पोलिसांमध्ये तणाव

बार्देश - 1 चे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांची पेडणे उपजिल्हाधिकारी, बाळा कोरगावकर यांची गोमेकॉ उपसंचालक (प्रशासन), प्रवीण परब यांची सत्तरीचे उपजिल्हाधिकारी व उत्तर वन वसाहत अधिकारी अतिरिक्त ताबा, इशांत सावंत यांची तिसवाडी उपजिल्हाधिकारी, अजय गावडे यांची उत्तर गोवा (महसूल) उपजिल्हाधिकारी, जुआंव फर्नांडिस यांची कुंकळ्ळी पालिका मुख्याधिकारी व दक्षिण वन वसाहत अधिकारी, शर्मिला गावकर यांची सालसेत - 2 उपजिल्हाधिकारी, प्रतिमा ब्रागांझा यांची कौशल्य विकास व उद्योजक उपसंचालक (प्रशासन), स्वाती दळवी यांची दक्षिण गोवा पंचायत उपसंचालक, पुंडलिक खोर्जुवेकर यांची गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपनिबंधक, सँड्रा डिसोझा यांची उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी (डीआरओ) व ‘रेरा’चा ओएसडीचा अतिरिक्त ताबा, सागर गावडे यांची फोंडा पालिका मुख्याधिकारी, राजू देसाई यांची सांगे उपजिल्हाधिकारी, केदार अशोक नाईक यांची माहिती व प्रसिद्धी खात्याचे संयुक्त संचालक, रमेश नाईक यांची धारबांदोडा उपजिल्हाधिकारी, पांडुरंग तळेगावकर यांची अन्न व औषध प्रशासन उपसंचालक (प्रशासन) व जीआयडीसी सरव्यवस्थापक अतिरिक्त ताबा, सोहन उस्कैकर यांची कृषी उपसंचालक (प्रशासन), माया पेडणेकर यांची दक्षता उपसंचालक, नॅथिन आरावजो यांची अवर सचिव (कार्मिक - 2), चंद्रकांत शेटकर यांची उत्तर गोवा भू संपादन उपजिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग व पीडब्ल्यूडीचे भू संपादन अधिकारी अतिरिक्त ताबा, गीता नागवेकर यांची पीडब्ल्यूडी उपसंचालक (प्रशासन) व मध्यवर्ती क्षेत्राच्या कोमुनिदादच्या प्रशासकाचा अतिरिक्त ताबा म्हणून बदली करण्यात आली आहे.

Transfers of 23 officers from Goa
Goa: विदेशी पर्यटक लागलेत कचरा गोळा करण्याच्या कमाला...

याव्यतिरिक्त प्रितीदास गावकर यांच्याकडे अवर सचिव (गृह - 2), शशांक ठाकूर यांच्याकडे उत्तर गोवा डीआरडीएच्या प्रोजेक्ट अधिकाऱ्याचा, अमालिया पिंटो यांच्याकडे एआरडीच्या अवर सचिवाचा, तिपन्ना मड्डीमणी यांच्याकडे दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकाचा, सीमा साळकर ऊर्फ वीरा नायक यांच्याकडे आदिवासी कल्याण खात्याचा उपसंचालक (प्रशासन), सचिन देसाई यांच्याकडे राज्य कर उपायुक्तपदाचा, तुळशीदास करंझाळकर यांच्याकडे एटी अँड सी चे साहाय्यक संचालक, तुषार हळर्णकर यांच्याकडे उच्च शिक्षण अवर सचिव, उच्च शिक्षण (विकास) उपसंचालकांचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com