निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 52 पोलीस कॉन्स्टेबल्सच्या बदल्या

निवडणुकीच्या काळात निवडणूक यंत्रणेशी संबंधित असलेल्या सरकारी कर्मचारी हा तो राहात असलेल्या मतदारसंघात कामाला असू नये, यासाठी त्यांच्या बदल्या करण्यात येतात.
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 52 पोलीस कॉन्स्टेबल्सच्या बदल्या
Transfers of 52 police constable in Goa Dainik Gomantak

पणजी: पोलिस खात्यातील 52 कॉन्स्टेबल्सच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही कॉन्स्टेबल्स हे राहात असलेल्या भागातच पोलिस स्थानकात कामाला होते, त्यांची बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने उपजिल्हाधिकाऱ्यांच्याही बदल्या या अनुषंगाने केल्या होत्या.

Transfers of 52 police constable in Goa
गोव्यातील 23 अधिकाऱ्यांच्या बदल्या

निवडणुकीच्या काळात निवडणूक यंत्रणेशी संबंधित असलेल्या सरकारी कर्मचारी हा तो राहात असलेल्या मतदारसंघात कामाला असू नये, यासाठी त्यांच्या बदल्या करण्यात येतात. येत्या काही दिवसांत आणखी काही पोलिस कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम सुरू झाले आहे.

Related Stories

No stories found.