वास्कोतील सरकारी कार्यालयासमोर ट्रान्स्फॉर्मर उघड्यावर

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

वास्कोत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विज ट्रान्सफॉर्मर्सचे आवरण नसल्याने टान्सफार्मर उघड्यावर असल्यामूळे येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना तसेच दुचाकी वाहनांना हा ट्रान्सफॉर्मर धोक्‍याचा ठरला आहे.

 दाबोळी :  वास्कोत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विज ट्रान्सफॉर्मर्सचे आवरण नसल्याने टान्सफार्मर उघड्यावर असल्यामूळे येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना तसेच दुचाकी वाहनांना हा ट्रान्सफॉर्मर धोक्‍याचा ठरला आहे.

     येथील मुरगाव पालिकेतील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रान्सफॉर्मर असून यातून वास्को शहरातील परिसरातील दुकान, आस्थापन, फ्लॅटमध्ये वीज प्रवाह केला जातो. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा ट्रान्सफॉर्मर दुचाकी वाहन पार्किंगच्या ठिकाणी असून या ट्रांसफार्मर शेजारी येथे आपल्या वैयक्तिक कामासाठी येणारे लोक दुचाक्या पार्किंग करून जातात. तसेच या ठिकाणी जवळच पदपथ व मुख्य रस्ता आहे. दरम्यान या ट्रांसफार्मरचा मुख्य दरवाजा गेले कित्येक महिने झाले तुटून पडला असून यावर संबंधितांचे वीज खात्याचे लक्ष नाही. त्यामुळे तो तसाच उघडा पडून आहे. सुमारे ४४० व्हाट्सचा हा ट्रांसफार्मर असून एखादी व्यक्ती किंवा दुचाकी पार्किंग करताना त्याच्या संपर्कात गेली तर मोठा हाहाकार माजला शिवाय राहणार नाही.

तसेच एखाद्या वेळी शॉर्टसर्किट झाल्यास येथे पार्क करून ठेवलेल्या दुचाकींचा नायनाट होणार. तसेच या ठिकाणी पदपथ असून या पदपथावरून जाणाऱ्या  लोकांनाही यापासून धोका निर्माण झाला आहे. तेव्हा कोणतीही अघटित गोष्ट घडण्यापूर्वी या ट्रान्सफॉर्मरवर आवरण घालावे अशी मागणी होत आहे. वीज खात्याने याविषयी त्वरित लक्ष घालून लोकांची ही समस्या सोडवावी व धोका दूर करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. फोटो : शहरात मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी उघडा असलेला ४४० व्हाट्सचा ट्रांसफार्मर व त्या ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या 
दुचाक्या.

संबंधित बातम्या