Mauvin Gudino: गोमंतकीयांच्या सेवेत आणखी 250 ई-बस होणार दाखल

दाबोळी ते वेर्णा उड्डाणपुलाचे काम येत्या चार महिन्यातच ते पूर्ण होणार
Mauvin Gudinho
Mauvin GudinhoDainik Gomantak

राज्यात वाढत असलेले पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी गोवा सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी गोव्यासाठी 250 इलेक्ट्रिक बसेस देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

(Transport minister Mauvin Godinho informs 250 electric buses will be provided for Goa)

Mauvin Gudinho
Goa Police: गोवा पोलिसांची मोठी कारवाई, मध्य प्रदेशला जाणारा 13 लाखाचा दारुसाठा जप्त

या बोबत बोलताना मंत्री गुदीन्हो म्हणाले की, राज्यात इलेक्ट्रिक बसची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केल्यानंतर गडकरी यांनी ताततडीने याबाबत आपण दिल्ली येथे बैठक आयोजित करत हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिलं असल्याचं गुदिन्हो म्हणाले. तसेच दाबोळी ते वेर्णापर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम ही वेगाने सुरु होणार असून येत्या चार महिन्यातच ते पूर्ण करणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली आहे.

Mauvin Gudinho
CM Pramod Sawant: सेझा कामगारांना सेवेत घेणे कंपनीला बंधनकारक

मिळालेल्या माहितीनुसार गडकरी सध्या गोवा राज्यात खाजगी दौऱ्यावर आहेत. असे असले तरी गोव्यासाठी त्यांनी ही घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून राज्यातील वाहतूक समस्या सोडण्यासाठी पुर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती गुदीन्हो यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com