Mauvin Gudinho: टॅक्सीवाले माफियांप्रमाणे वागताहेत, वाहतूक मंत्र्यांचे वक्तव्य

दाबोळी विमानतळावर विमाने येण्याची संख्या वाढली आहे : गुदिन्हो
mauvin godinho
mauvin godinhoDainik Gomantak

Mauvin Gudinho: "टॅक्सीवाले माफियांप्रमाणे कार्य करत आहेत. त्यांना मक्तेदारी हवी आहे. ॲप-आधारित टॅक्सी भविष्यात रेकॉर्ड राखण्यास मदत करेल. मोपा विमानतळ कार्यरत झाल्यानंतर दाबोळी विमानतळाबाबत लोकांनी शंका उपस्थित केल्या होत्या."

"पण दाबोळी विमानतळावर विमाने येण्याची संख्या वाढली आहे. सर्व टॅक्सीं व्यवसायिकांना तेथे व्यवसाय आहे. मोपा ब्लू टॅक्सीच्या काउंटरचे काम प्रगतीपथावर सुरु आहे" असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

mauvin godinho
जपानी पर्यटकाची लुबाडणूक प्रकरण! गुन्हा दाखल होताच दोन दिवसांत तिघांना अटक

राज्यात होणाऱ्या वाढत्या अपघातांसदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाहतूक मंत्र्यांनी ही माहिती दिली.

गोव्यात 2021 च्या तुलनेत 2022 आणि 2023 मध्ये अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. 2023 च्या पहिल्या 48 दिवसात तर 50 हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. माहितीनुसार राज्यातल्या या वाढत्या घटनांचे कारण म्हणजे वाहनचालकांचा बेशिस्तपणाच असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील लोक वाहन चालवताना नियम पाळत नाहीत. लोक दारू पिऊन गाडी चालवतात, बेधडक ओव्हरटेकिंग करतात. त्यामुळेच या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com