मासळी न गवसल्याने ट्रॉलर मालकांत निराशा

Trawler owner on Kutban jetty dissatisfied
Trawler owner on Kutban jetty dissatisfied

नावेली: कोरोना काळात कुटबण जेटीवरील पारंपारिक ट्राॅलर मच्छीमार समाधानी तर खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणार्या मोठ्या ट्राॅलर मालकांना अद्याप म्हणावी तशी मासळी न गवसल्याने अद्याप असमाधानी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


कोरोना टाळेबंदीमुळे यावर्षी मासेमारीला उशीरा सुरवात झाली आपल्यामुळ गावी गेलेले कामगार न परतल्याने त्याना गोव्यातून खास खाजगी बसी त्या राज्यात  पाठवून कामगारांना गोव्यात आणण्यात आले. कामगार न परतल्याने काही ट्राॅलर मालकांनी आपले ट्राॅलर बंद ठेवणे पसंत केले तर काही ट्राॅलर मालकांनी ज्याना कामगार गोव्यात आणणे शक्य आहे त्यांनी कामगार आणले अशी माहीती कुटबण फिशरीज सोसायटीचे अध्यक्ष विनय तारी यांनी सांगितले.


दरवर्षी गावाला गेलले कामगार स्वतःहून कुटबण जेटीवर परतत होते परंतू यावर्षी रेल्वे वहातूक बंद असल्याने खाजगी बसी पाठवून कामगारांना गोव्यात आणण्यात आले असे तारी यांनी सांगितले. कुटबण ट्राॅलर मालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसील्वा यांना विचारले असता लहान ट्राॅलर वाल्यांना यावेळी चांगला व्यवसाय झाल्यांचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com