कुर्टीत घरावर झाड कोसळले

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

यावेळी घरात असलेली शिल्पा नाईक ही महिला जखमी झाली. तिला आयडी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

फोंडा

नागझरी - कुर्टी फोंडा तसेच बेतोडा येथे मॅकडोवेल प्रकल्पाजवळील घरावर झाडे कोसळल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अचानकपणे आलेल्या वारा आणि पावसामुळे नागझरी - कुर्टी तसेच बेतोडा अशा दोन ठिकाणी ही पडझड झाली. नागझर - कुर्टी येथील दामोदर नाईक यांच्या राहत्या घरावर जुने आंब्याचे झाड कोसळले. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. हे जुने झाड कोसळताना मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराट उडाली. यावेळी घरात असलेली शिल्पा नाईक ही महिला जखमी झाली. तिला आयडी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे जुने झाड तोडण्यासंबंधीचे अर्ज दामोदर नाईक यांनी पंचायत तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयात दिले होते, अशी माहिती देण्यात आली, मात्र कार्यवाही न झाल्याने हे झाड कोसळले.
झाड कोसळल्यानंतर सरपंच शैलेश शेट, स्थानिक पंच दादी नाईक व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. फोंडा अग्निशामक दलाने मदतकार्य केले. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनीही या दूर्घटनेची दखल घेतली आहे. दरम्यान, बेतोडा येथे मॅकडोवेल प्रकल्पाजवळ असलेल्या एका घरावर फणसाचे झाड कोसळून या घराचीही मोठी हानी झाली असल्याची माहिती देण्यात आली.

 

 

संबंधित बातम्या