मेरशीतील खारफुटीच्‍या 2 हजार झाडांची कत्तल; तृणमूल काँग्रेसचा आरोप

मेरशी परिसरात विकास प्रकल्‍प आणण्यासाठी येथील खारफुटींची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्‍याचे विल्‍सन फर्नांडिस म्‍हणाले.
मेरशीतील खारफुटीच्‍या 2 हजार झाडांची कत्तल; 
तृणमूल काँग्रेसचा आरोप
Tree cuttingDainik Gomantak

पणजी : सांताक्रूझ मतदारसंघातील मेरशी परिसरातील सुमारे 2000 खारफुटीची कत्तल केल्‍याचा आरोप तृणमूल काँग्रेस गोवाचे समन्‍वयक राजेंद्र काकोडकर यांनी केला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी दशरथ मांद्रेकर, विल्‍सन फर्नांडिस आणि कांता गावडे आदी उपस्‍थित होते.

Tree cutting
'झुआरी जमीन घोटाळ्यावर सरकारची करडी नजर'

मेरशी परिसरात विकास प्रकल्‍प आणण्यासाठी येथील खारफुटींची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्‍याचे विल्‍सन फर्नांडिस म्‍हणाले. विकासाच्‍या नावाखाली सत्ताधारी भाजप पक्ष जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ते म्‍हणाले. कांता गावडे म्‍हणाले, सांताक्रूझ हा निसर्गसंपन्‍न मतदारसंघ आहे. येथील झाडांची कत्तल करून मोठमोठ्या इमारती आणि प्रकल्‍प उभारले जात आहेत. खारफुटीची कत्तल वेदनादायक आहे. संबंधित व्‍यक्‍तीने रसायनाचा वापर करून येथील खारफुटीची कत्तल केली आहे. तरीही वन खाते याकडे डोळेझाक करत असल्‍याचे ते म्‍हणाले.

Tree cutting
मच्छीमार व्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार : हळर्णकर

यावेळी दशरथ मांद्रेकर म्‍हणाले, भाजपचे सरकार केवळ मेरशीत नव्,‍हे तर संपूर्ण राज्‍यातील निसर्गाला संपवायला निघाले आहे. विकासकामांच्‍या नावाखाली झाडांची कत्तल, डोंगराची कापणी, शेतजमिनी आणि लोकांची घरे पाडण्याचे काम सुरू आहे. सरकारचा आशीर्वाद असल्‍याने संबंधित व्‍यक्‍तीने मेरशीतील खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे. लोकांनी याविरुद्ध आवाज केल्‍याशिवाय सरकाला जाग येणार नाही. येथील खारफुटीची कत्तल करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com