कुमुदिनी कवळेकर यांना श्रद्धांजली

प्रतिनिधी
रविवार, 16 ऑगस्ट 2020

गोवा मुक्तीलढ्यात महिला म्हणून महत्त्‍वाचे योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानी कुमुदिनी दामोदर कवळेकर यांचा २०वा स्मृतिदिन पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयात साजरा करण्यात आला. 

काणकोण:  गोवा मुक्तीलढ्यात महिला म्हणून महत्त्‍वाचे योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानी कुमुदिनी दामोदर कवळेकर यांचा २०वा स्मृतिदिन पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयात साजरा करण्यात आला. 

कवळेकर या पैंगीण येथील कन्या असून त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी श्रद्धानंद ज्ञानप्रसारक संस्थेकडे कायम निधी ठेवला आहे. गेली पंधरा वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धा घेऊन हा दिवस साजरा करण्यात येतो. यंदा करोना महामारीमुळे स्पर्धाचे आयोजन न करता ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कवळेकर कुटुंबिय, विद्यार्थी तसेच श्रद्धानंद ज्ञान प्रसारक मंडळाचे पदाधिकारी,विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाला श्रद्धानंद विद्यालयाचे व्यवस्थापक आनंद शेणवी, श्रद्धानंद ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल पैंगणकर, मुख्याध्यापिका सीमा प्रभूगावकर, सुभाष महाले, प्रेमानंद पागी, चिन्मय आमशेकर यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. 

मुख्याध्यापिका प्रभूगावकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजक प्रेमानंद पागी यांनी केले. चिन्मय आमशेकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या