
घाटांमध्ये अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनमोड घाटात आज सकाळी पहाटे एका अवजड ट्रकचा अपघात घडला. या ट्रकची रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या दगडाला ठोकर बसल्याने ट्रकचालक रमेश चिल्लापनी (तेलंगणा) याचे जागीच निधन झाले.
अपघात झाल्यानंतर अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटणस्थळी धाव घेत ट्रकमधून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पंचनामा कुळे पोलिसांनी केला.
दरम्यान, कुंकळ्ळीमध्ये 24 जानेवारीला अपघातांचे सत्र पाहायला मिळाले. तीन वेगवेगळ्या अपघतांत एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोनजण जखमी झाले आहेत. साल्झोरा येथे दोघांचा, चिंचणीत एका युवकाचा तर कुंकळ्ळी कंदब बसस्थानकाजवळ कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.