गिरीत राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकांचा भीषण अपघात

एक ट्रक सर्व्हिस रोडवर तर दुसरा मुख्य रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली
गिरीत राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकांचा भीषण अपघात
Truck Accident in Mapusa Guirim Dainik Gomantak

म्हापसा : मोंत गिरी येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ट्रक सर्व्हिस रोडवर तर दुसरा रस्त्यावर आडवा झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा हा अपघात घडल्याची माहिती आहे. अपघातामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूकही खोळंबली होती.

Truck Accident in Mapusa Guirim
'गोव्यात खंडित विजेमुळे उद्योगांचे नुकसान'

म्हापशाजवळच असलेल्या गिरी भागात सोमवारी रात्री दोन ट्रकचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या धडकेत महामार्गाशेजारीस दोन माडही मोडले. दोन ट्रकांपैकी एक सर्व्हिस रोडवर तर दुसरा रस्त्यावर आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. या अपघातात ट्रक चालकाला इजा झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Truck Accident in Mapusa Guirim
फोंड्यात हिट अँड रनचा थरार; पाठलाग करुन मद्यधुंद चालकाला चोप

दरम्यान सोमवारी दुपारीच फोंड्यात हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. फोंड्याजवळच असलेल्या खांडेपार येथे एका पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन पसार होणाऱ्या चालकाच्या कारचा अपघात झाला. भरधाव वेगातील कारची एका झाडाला धडक बसून कारने जागीच पेट घेतला. कारच्या मागावर असणाऱ्या आरोपी चालकाला लागलीच ताब्यात घेतलं मात्र पाठलाग करणाऱ्या तरुणांनी चालकाला चोप दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.